हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अतरंगी सुपरस्टार अभिनेता रणवीर सिंग गेल्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत राहिला. अनेकांनी या फोटोशूटचे समर्थन केले तर अनेकांनी यावरून रणवीरला ट्रोल केलं. इंडस्ट्रीमध्ये ‘मेरी मर्जी’ असं काही नसतं म्हणत इंडस्ट्रीतील अनेकांनी या फोटोशूटवर टीकेची झोड उठवली. यानंतर आता रणवीरविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात FIR दाखल झाली आहे. मात्र अद्याप अटक झालेली नाही.
#UPDATE | Taking cognisance of a complaint filed against him at Mumbai's Chembur PS, FIR filed against actor Ranveer Singh for posting nude pictures on his Instagram account.
IPC Sections 292 (Sale, etc of obscene books, etc) 293, 509 and sections of IT Act invoked.
(File pic) pic.twitter.com/lLFggvl7s1
— ANI (@ANI) July 26, 2022
अभिनेता रणवीर सिंह याने अलिकडेच एका मॅगझिनसाठी हे फोटोशूट केलं होत. मुख्य म्हणजे हे फोटोशूट फक्त मॅगझीनपुरता मर्यादित राहील नाही तर हे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. यामुळे सोशल मीडियावर रणवीर प्रचंड ट्रोल झाला. शिवाय हे चालणार नाही म्हणत अनेकांनी त्याच्या फोटोशूटवर कमेंट्स केल्या. हे वादग्रस्त फोटोशूट आल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनीदेखील यावर सवाल उपस्थित केले होते. एखाद्या अभिनेत्याचे नग्न फोटो चालतात मात्र मुलींनी त्यांच्या मर्जीने हिजाब घातलेला चालत नाही. हे आपण कोणत्या सांस्कृतिककडे चाललो आहे. असे ते म्हणाले होते. हे प्रकरण एकीकडे वैयक्तिक पातळीचे न राहता सामाजिक पातळीचा विषय झाल्यामुळे रणवीर गोत्यात येण्याची शक्यता आहे.
एकीकडे रणवीर प्रचंड ट्रोल होत असताना दुसरीकडे बॉलीवूड मात्र त्याच्या पाठीशी बऱ्यापैकी समर्थनार्थ दिसले. ‘त्याला योग्य वाटतं ते त्यानं केलं. तो त्यात कम्फर्टेबल असेल तर त्याने ते करावं. त्याने काय करावं आणि काय न करावं हे सांगणारे आपण कोण?’ अशा अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. तर अनेक बॉलीवूडच्या मंडळींनी या प्रकरणावर बोलण्यावर नकार दिला होता. देशभरातून या प्रकरणावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आणि अखेर या प्रकरणाने पोलीस स्टेशन गाठलं. त्यामुळे आता हे प्रकरण रणवीर सिंगला भोवणार असे दिसून येत आहे.
Discussion about this post