हॅलो बॉलिवूड ऑनलाइन | विविध राजकीय आणि सामजिक विषयांवर प्रखर भूमिका घेणारे अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो मालिकेतुन हकालपट्टी करण्यात आली. आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळेच आपल्याला मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप किरण माने यांनी केल्यानंतर एकंदरच सर्व स्तरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय नेतेमंडळी देखील रस घेत असल्याचे दिसत आहे. यामध्ये काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, जितेंद्र आव्हाड आणि अगदी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचाही समावेश आहे.
किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपाला सहन झाले नाही त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजपा विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे. #IStandWithKiranMane pic.twitter.com/PE7Jn28si0
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 13, 2022
सचिन सावंत यांनी ट्विट केली कि, किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपाला सहन झाले नाही त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजपा विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे. पण हीच भाजपा सेलीब्रिटींवर दबाव आणून आपल्या शेतकरीविरोधी किंवा मोदी समर्थनाच्या अजेंड्यावर बोलायला भाग पाडते. मविआ सरकारने ठामपणे किरण मानेंच्या पाठीशी उभे राहावे व स्टार प्रवाहचे कान उपटून भाजपाच्या सांस्कृतिक दहशतवादाला उखडून टाकावे. भाजपातर्फे कोणी दबाव आणला याची चौकशी व्हावी
स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणा-या किरण माने या अभिनेत्यास फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मिडीयावर लिहीतो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणुन अचानक मालिकेतुल काढुन टाकले गेले.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 13, 2022
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणा-या किरण माने या अभिनेत्यास फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मिडीयावर लिहीतो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणुन अचानक मालिकेतुल काढुन टाकले गेले. पुढे म्हणाले, या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल.देशपांडे,निलु फुले या कलाकारांनी कधी टिका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला. याद राखा,हा महाराष्ट्र वैचारीक वारसा जोपासत तुमच्या विरोधात लिहीले म्हणुन तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही. स्टार प्रवाह नि एका नवीन वादाला तोंड फोडले आहे त्यांनी ह्यात पडायची गरज नव्हती
तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीदेखील किरण मानेंचे समर्थन केले आहे. शंभूराज देसाई म्हणाले कि, या बाबत वाहिनीला आणि वाहिनीच्या व्यवस्थापनाला उत्तर द्यावे लागेल. जर अशी काहीही घटना घडली असेल तर हा महाराष्ट्रातील कलाकारावर झालेला अन्याय आहे. हा अन्याय आम्ही कधीही सहन करणार नाही. या संदर्भात मी स्वतः किरण माने यांच्याशी संवाद साधेन.
Discussion about this post