Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूड- टॉलिवूड गाजवणाऱ्या पूजा हेगडेने गायलं मराठी भक्तीगीत; चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 15, 2022
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Pooja Hegde
0
SHARES
3k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवुड सिनेइंडस्ट्रीसह टॉलीवुड सिनेइंडस्ट्री गाजवणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री पूजा हेगडेचे नाव घेतले नाही असे होऊच शकत नाही. कारण पूजा हेगडे सध्या या दोन्ही सिने इंडस्ट्री अक्षरशः गाजवते आहे. ज्यामुळे ती प्रचंड चर्चेत असते. सध्या पूजा तिचा आगामी चित्रपट ‘सर्कस’मूळे चर्चेत आहे. नुकतीच या चित्रपटाची पूर्ण स्टारकास्ट प्रमोशनसाठी ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आली होती आणि यावेळी पूजाने जे केलं ते पाहून भले भले फक्त पाहतच राहिले.

View this post on Instagram

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

झी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. यामुळे अनेक बडे बडे स्टार्स, मराठी ते बॉलिवूड आणि बॉलिवूड ते टॉलिवूड पर्यंत कित्येक सिनेमे या शोच्या मंचावर प्रमोट केले जातात. रोहित शेट्टी तर जणू या कार्यक्रमाचा एक भागच झाला आहे. त्याचा कोणताही चित्रपट येणार म्हटलं कि तो चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अख्खी टीम घेऊन येतोच येतो. नुकतेच सर्कस चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी या मंचावर उपस्थित राहिले होते. यावेळी पूजाने चक्क मराठी भक्तीगीत ‘देहाची तिजोरी’ गायले आणि सगळ्यांना थक्क करून टाकलं.

View this post on Instagram

A post shared by ⛳😊मराठी दुनिया😊⛳ (@marathiduniyaa)

 

क्षणभर अनेकांना ती मराठी भक्तीगीत गातेय यावर विश्वासचं बसला नाही. यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधव, रणवीर सिंग, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेत्री पूजा हेगडे, जॉनी लिव्हर, जॅकलिन फर्नांडिस आणि अनेक कलाकार उपस्थित होते. यांनी तिला मराठी गाणं गाण्याची विनंती केली आणि तिने चक्क भक्तीगीत गायलं. ‘देहाची तिजोरी.. भक्तीचाच ठेवा.. उघड दार देवा आता.. उघड दार देवा’ म्हणत तिने सगळ्यांचं मन काही सेकंदातच जिंकलं. स्वप्नील जोशीला तर काय बोलू आणि काय नाही असं झालं होतं. पण सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ती मराठी असून स्पष्ट मराठी बोलत नाही, मराठी आहे तर मराठी यायलाच हवं, मराठीशिवाय पर्याय नाही गं बाई.. अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Tags: chala hawa yeu dyaCirkusInstagram PostPooja HegdeViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group