Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’; सोनी मराठी पाठवणार अवघ्या महाराष्ट्राला ‘हास्याची मनी ॲार्डर’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 6, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ
Post Office Ughad Ahe
0
SHARES
204
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वात सोनी मराठी हि मराठी वाहिनी आघाडीच्या स्तरावर आहे. सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने तर आधीच अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. बहुरंगी विनोदी कलाकारांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. यानंतर आता हि वाहिनी विनोदाचा डबल डोस घेऊन येण्यास सज्ज झाली आहे. एकीकडे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि आता दुसरीकडे ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ हि नवी मालिका येऊ घातली आहे. मुख्य म्हणजे हि मालिका देखील एक विनोदी मालिका आहे. त्यामुळे प्रेक्षकहो हसायला तय्यार व्हा!

View this post on Instagram

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

अलीकडेच सोनी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांना दाखविण्यात अली आहे. ‘अवघ्या महाराष्ट्राला पाठवत आहोत हास्याची मनी ॲार्डर…नवी मालिका -‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…..’लवकरच… सोनी मराठी वाहिनीवर..’ अशा कॅप्शनसह या मालिकेची झलक शेअर करण्यात आली आहे. यामध्ये बॅकग्राऊंडला एक आवाज ऐकू येतोय. लहानपणी आपण खेळ खेळला असेलच.. आईच पत्र हरवलं..’ तेच लहान मुलगा बोलत असल्याचा आवाज मागून येतो आणि इतक्या आणखी एक आवाज येतो.. ‘पोस्ट.. पोस्ट.. पोस्टाची गोष्ट.. हसायचं मस्त.. हसायचं मस्त’

पोस्ट ऑफिसचा काळ अनुभवलेल्या पिढीला हा कार्यक्रम त्यांच्या काळात घेऊन जाऊ शकतो. सोबतच हास्याची एक हलकी फुलकी झुळूक आहेच. नेहमीच्या किरकिरमधून काहीतरी नवीन म्हणून ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’ या मालिकेची उत्सुकता आता सगळ्यांनाच आहे. या मालिकेतून ‘पोस्ट ऑफिस’ हा विषय सोनी मराठी घेऊन येते आहे. पण यातून हास्याची मनी ऑर्डर कोण घेऊन येणार हे जाणून घेण्याची उत्सुकता काही औरच आहे. चर्चेनुसार पंढरीनाथ कांबळे आणि अलीकडेच हास्यजत्रा सोडलेला ओंकार भोजने या मालिकेतून आपल्या भेटीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच या मालिकेचा पुढील प्रोमो समोर येईल.

Tags: Instagram PostNew SerialPost Office Ughad AhePromo VideoSony Marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group