हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘वय वाढतं पण आठवणी तशाच राहतात’ अशी जबरदस्त लक्षवेधी टॅगलाइन असलेला ‘गेट टुगेदर’ हा चित्रपट येत्या २६ मे २०२३ पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ‘गेट टुगेदर’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे. यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत जी पाटीलदेखील उपस्थित होते.
सतनाम फिल्म्स प्रस्तुत “गेट टुगेदर” या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी, साकिब शेख आदींच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
‘गेट टुगेदर’ हा चित्रपट शाळेतल्या जुन्या झालेल्या आठवणी नव्याने ताज्या करणार आहे. याचे कथानक आपलेसे असल्यामुळे चित्रपटाचे पोस्टर, टिझर तरुण वर्गात चर्चेचा विषय ठरला आहे. अशातच आता माजी केंद्रीय कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या हस्ते नुकतेच चित्रपटाच्या अधिकृत पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
‘गेट टुगेदर’ या चित्रपटाचा टीजर रीलिज झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत असणारी उत्सुकता वाढीस लागली आहे. आतापर्यंत चित्रपटातील २ गाणी रिलीज झाली असून त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Discussion about this post