Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘कमळाच्या फुलात मादक स्त्री’; ‘गंदी बात’ सीरिजच्या पोस्टरमधून देवी लक्ष्मीचा अपमान..? नेटकरी भडकले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 15, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, वेबसिरीज, सेलेब्रिटी
Gandi Baat 6
0
SHARES
139
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिरीयल क्वीन अशी ओळख असणारी एकता कपूर तिच्या ‘अल्ट बालाजी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एका सिरीजमुळे मोठ्या वादात अडकली आहे. मध्यंतरी या प्लॅटफॉर्मवरील एका सीरिजमध्ये भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. भारतीय सैन्याबाबत काही आक्षेपार्ह गोष्टी दाखवल्यामुळे तिच्यावर जोरदार टीका झाली होती. यानंतर आता तिच्या ‘गंदी बात’ या सीरिजच्या पोस्टरमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे.

View this post on Instagram

A post shared by CelebsFeed (@celebsfeed.in)

‘अल्ट बालाजी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘गंदी बात’ हि सिरीज सर्वाधिक पाहिली जाते. या वेब सीरिजच्या सहाव्या सीझनचे पोस्टर अलीकडेच समोर आले आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले. जे पाहून नेटकऱ्यांनी एकता कपूरचा क्लास घेतला आहे. ‘गंदी बात सिझन ६’ या सीरिजच्या पोस्टरमधून देवी लक्ष्मीचा अपमान केल्याचा दावा काही लोकांनी केला आहे. या पोस्टरमध्ये एक स्त्री पाठमोरी उभी असल्याचे दिसत आहे. तर तिच्या साडीचा पदर खाली गेला असून तिच्या कंबरेजवळ कमळाचे फूल दिसत आहे. तसेच या पोस्टरच्या दोन्ही बाजूला मोराचे चित्रदेखील दिसत आहे. हे पोस्टर लक्ष्मी मातेच्या प्रतिमेशी मिळते जुळते असल्याने यावर प्रचंड टीका होत आहे.

@PMOIndia @HMOIndia @ianuragthakur @AskAnshul @ajeetbharti @narendramodi please ban on ALT BALAJI for save our culture and society 🙏🙏🙏 https://t.co/IjSMn1ECeZ

— Amit Kumar Singh (@amitk3singh) June 13, 2023

सोशल मीडियावर हे पोस्टर तुफान व्हायरल होत आहे आणि एकता कपूर प्रचंड ट्रोल होत आहे. या पोस्टमुळे ट्विटरवर हॅशटॅग बॅन एकता कपूर आणि हॅशटॅग बॅन अल्ट बालाजी अशा हॅशटॅगचा वापर करून तीव्र निषेध केला जात आहे. याबाबत एका नेटकऱ्याने तर असेही म्हटले आहे कि, ‘अल्ट बालाजी हा एकता कपूरचा प्लॅटफॉर्म आहे. यांच्या नावात बालाजी आहे पण कामं फारच वाहियाद आहेत. त्यांच्या या प्लॅटफॉर्मवर संपूर्ण सॉफ्ट पॉर्न कंटेंट आपल्याला पाहायला मिळतो. आता तर त्यांनी कहर केला आहे, एका मादक महिलेला कमळावर बसवून त्यांनी हे थम्बनेल तयार केलं आहे. हे फक्त मलाच आपत्तीजनक वाटतंय की तुम्हालाही तसंच वाटतंय?’ तर काहींनी असेही म्हटले आहे, ‘जो तो देवांचा अपमान करतो आहे.. एकताने तर देवी लक्ष्मीचा अपमान करून कहरच करून दाखवला आहे’.

Tags: Alt Balajiekta kapoorGandi Baat WebseriesOTT PlatformSocial Media TrollingTweeter Trending
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group