Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

परिणीती चोप्रा आणि हार्डी संधूच्या स्पाय मुव्हीचे पोस्टर आऊट; ‘या’ दिवशी होणार रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Code Name Tiranga
0
SHARES
123
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या बराच काळापासून अभिनेत्री परिणीती चोप्रा हि मनोरंजन विश्वासोबत फारशी जोडलेली नव्हती. ओटीटीवर काही काळ काम केल्यानंतर परिणीतीने एक छोटासा ब्रेक घेतला होता. यानंतर आता ती लवकरच तिच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या भूमिकेत येण्यास सज्ज झाली आहे. राष्ट्र, प्रेम आणि त्यागाची गोष्ट घेऊन ‘कोड नेम तिरंगा’ या चित्रपटातून परिणीती चोप्रा पहिल्यांदाच हार्डी संधूसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by 𝙿𝚊𝚛𝚒𝚗𝚎𝚎𝚝𝚒 𝙲𝚑𝚘𝚙𝚛𝚊 🫧 (@parineetichopra)

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि हार्डी संधू यांचा एकत्र म्हणायचं असा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे दोघांचेही चाहते त्यांच्या या चित्रपटासाठी फारच उत्सुक आहेत. ‘कोड नेम तिरंगा’ हा चित्रपट येत्या ऑक्टोबरमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी सोशल मीडियावर या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. परिणितीने सोशल मीडियावर याचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरवरून हा चित्रपट एक ॲक्शन थ्रिलर, स्पाय लव्ह स्टोरी ड्रामा असेल असा अंदाज आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा, हार्डी संधू यांच्यासह शरद केळकर, दिव्येंदू भट्टाचार्य, शिशीर शर्मा, सब्यसाची चक्रवर्ती हे दिग्गज कलाकार देखील दिसणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Harrdy Sandhu (@harrdysandhu)

माहितीनुसार, या चित्रपटात परिणीती चोप्रा हि रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तिची भूमिका नक्कीच हटके आहे. ‘कोड नेम तिरंगा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रिभू दासगुप्ता, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी केले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती टी- सिरीजने केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक रिभू दासगुप्ता या कलाकृतीविषयी बोलताना म्हणाले कि, ‘माझ्या पुढच्या चित्रपटाचे नाव जाहीर करताना आनंद होत आहे. हा चित्रपट १४ ऑक्टोबर २०२२ रोजी रिलीज होणार आहे. आशा आहे की प्रेक्षकांना हा ॲक्शन एंटरटेनर आवडेल, जी सैनिकाच्या बलिदानाची स्टोरी आहे.’

Tags: Bollywood Upcoming MovieHarrdy SandhuInstagram Postparineeti chopraViral Poster
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group