Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बेबी ऑन बोर्ड’; प्लॅनेट मराठी घेऊन येतंय पहिल्या प्रेग्नंन्सीची मजेशीर गोष्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 18, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, वेबसिरीज, सेलेब्रिटी
Baby On Board
0
SHARES
139
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, फिल्मी आऊल स्टुडिओज प्रस्तुत ‘बेबी ऑन बोर्ड’ या सिरीजचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. विवाहित जोडप्याच्या आयुष्यात लग्नानंतर येणारा आणखी एक अविस्मरणीय क्षण म्हणजे त्यांना होणारे पहिले बाळ. आनंद, भीती, उत्सुकता अशा अनेक भावना यावेळी एकत्र मनात येत असतात. मग सुरु होतो तो नऊ महिन्यांचा नवा प्रवास. याच सुंदर प्रवासाची कहाणी आपल्याला या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. ‘बेबी ऑन बोर्ड’ लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Planet Marathi प्लॅनेट मराठी (@planet.marathi)

प्रतिक्षा मुणगेकर, अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या सिरीजचे लेखन व दिग्दर्शन सागर केसकर यांचे असून साईनाथ राजाध्यक्ष व बिना राजाध्यक्ष या सीरिजचे निर्माते आहेत. तर अंकित शिंदे व दिव्या घाग हे कार्यकारी निर्माते आहेत. ‘बेबी ऑन बोर्ड’ या शीर्षकावरून आणि पोस्टरवरूनच यात काय धमाल आणि मनोरंजनात्मक किस्से असतील, याचा अंदाज येतोय. ‘बेबी ऑन बोर्ड’च्या माध्यमातून प्लॅनेट मराठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नाविन्यपूर्ण सिरीज घेऊन आले आहे.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘बेबी ऑन बोर्ड नवीन संकल्पना असलेली सिरीज आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. उत्तम दिग्दर्शक व कलाकारांची साथ लाभली. आजच्या तरुणाईला आवडेल, जवळची वाटेल, अशी ही वेबसिरीज आहे. लग्नानंतरच्या या टप्प्यात जोडीदारासोबतच कुटुंबासोबतचे बाँडिंगही पाहायला मिळेल. ही प्रेमळ, हलकी फुलकी लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.’

Tags: Planet MarathiPoster ReleasedUpcoming Web SeriesViral Poster
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group