Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘थांबायचं नाय गड्या, थांबायचं नाय’; ‘दे धक्का 2’ ची सुसाट गाडी करणार लंडन वारी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 11, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
De Dhakka 2
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘दे धक्का’ हा चित्रपट कायम आठवणीत राहील असाच आहे. त्यानंतर दे धक्का २ कधी येणार अशी उत्सुकता प्रेक्षकांना होती. तर मित्रांनो, आता प्रतीक्षा संपली. येत्या ५ ऑगस्ट २०२२ रोजी लंडनवर स्वारी करायला तयार व्हा. कारण दे धक्का २ रिलीज होतोय. मनसोक्त हसवायला आणि विनोदाच्या सगळ्या मर्यादा पार करायला अखेर बहुप्रतीक्षित ‘दे धक्का २’ येतोय. हि बातमी प्रेक्षकांसाठी एखादी आनंद लहरच म्हणावी लागेल. याआधी सोशल मीडियावर चित्रपटाचं पोस्टर चांगलाच चर्चेत आलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

कोरोनामुळे रखडलेला ‘दे धक्का २’ अखेर आता रिलीज होतो आहे. येत्या ५ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट रिलीज होणार असे निर्मात्यांनी सांगितले आहे. तूर्तास या चित्रपटाचे दमदार पोस्टर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि निर्माते अमेय खोपकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर केले आहे. आषाढी एकादशीचे निमित्त साधून १० जुलै रोजी ‘दे धक्का २’चे पोस्टर रिलीज झाले आहे. यंदा मनोरंजनाची ही गाडी थेट लंडनवर स्वारी करायला सज्ज झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

या पोस्टरमध्ये ओळखीच्या चेहऱ्यांचा अनोखा आणि मॉर्डन अवतार पहायला मिळतोय. या पोस्टरमध्ये मेधा मांजरेकर, मकरंद अनासपूरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अभिनेते प्रवीण तरडेसुद्धा दिसत आहेत. म्हणजेच नव्या जुन्या कलाकारांच्या सोबतीने हा नवा दमदार प्रवास रंगणार आहे. महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का २’ तुमच्या जवळच्या सिनेमागृहात ५ ऑगस्टपासून. थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय’, असे कॅप्शन देत चित्रपटाचे पोस्टर कलाकारांनी शेअर केले आहे. यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Tags: de dhakka 2Instagram PostMahesh ManjrekarNew Poster LaunchedUpcoming Marathi Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group