Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रजनीकांत यांच्या ‘जेलर’चा फर्स्ट लूक आउट; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 23, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Jailer
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साऊथ सिने इंडस्ट्रीचे थलायवा म्हणजेच अभिनेता रजनीकांत यांचं एक वेगळंच क्रेझ आहे. वयाच्या ७१ व्या वर्षीसुद्धा रजनीकांत आपल्या हटके स्टाईलने चाहत्यांची मनं जिंकताना दिसतात. यानंतर आता प्रचंड उत्साह आणि एनर्जीसह एका नव्या चित्रपटातून ते आपल्या चाहत्यांना मोहित करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या सोशल मिडीयावर त्यांच्या आगामी चित्रपटाचे नवे पोस्टर चांगलेच चर्चेत आले आहे. या चित्रपटाचे नाव ‘जेलर’ असे आहे. या चित्रपटाचे पोस्टर त्यांच्या पूर्व जावयाने म्हणजेच अभिनेता धनुषने देखील सोशल मीडियावर हेअर केले आहे.

#Jailer begins his action Today!@rajinikanth @Nelsondilpkumar @anirudhofficial pic.twitter.com/6eTq1YKPPA

— Sun Pictures (@sunpictures) August 22, 2022

दिग्दर्शक नेल्सन यांचा आगामी चित्रपट ‘जेलर’ हा वेगळ्या धाटणीचा धमाकेदार चित्रपट आहे. यामध्ये थलायवा रजनीकांत एका वेगळ्या लूकमध्ये आणि फुल्ल जोशात आपले पात्र साकारताना दिसणार आहेत. सन पिक्चर्स निर्मित या चित्रपटाचे कथानक नेमके काय आहे….? हे अद्याप सांगितलेले नाही. मात्र शीर्षक आणि आणि पोस्टर पाहून असे वाटत आहे कि कायदा आणि नियमांशी संबंधित याचे कथानक असावे. तसेच रजनीकांत या चित्रपटातील प्रमुख आणि दमदार भूमिकेत दिसत आहेत.

Wow !! pic.twitter.com/5QTMJwR5yS

— Dhanush (@dhanushkraja) August 22, 2022

या चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध रविचंदर यांचे आहे. तर नेल्सन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. शिवाय अभिनेता रजनीकांत मुख्य पुरुष व्यक्तिरेखेत आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही मुख्य महिला व्यक्तिरेखेत आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अभिनेता राम्या कृष्णन, शिवराज कुमार आणि वसंत रवी हे कलाकार देखील या चित्रपटात अन्य मुख्य भूमिकेत असतील अशी माहिती आहे. तूर्तास हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. धनुषनेदेखील हे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे आणि सोबत ‘Wow’ असे कॅप्शन दिले आहे. रजनीकांत यांचे चाहते त्यांना नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले असून लवकरच चित्रपट रिलीज होईल.

Tags: dhanushNew Upcoming MoviePoster ReleasedRajanikanthsouth actortwitterViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group