Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आमचं ‘वेड’ तुमच्यापर्यंत येतंय’; रितेश- जिनिलियाच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 27, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ved
0
SHARES
369
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड सिने इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाने अव्वल स्थान मिळवलेला हरहुन्नरी अभिनेता रितेश देशमुख हा नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही नवा प्रयोग करीत असतो. कधी अव्वल भूमिकेतून तो चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणतो तर कधी वेगवेगळ्या इंस्टा रिल्समधून तो चाहत्यांना हसायला भाग पडतो.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

यानंतर आता पहिल्यांदाच रितेश एक आव्हान घेताना दिसतोय. हे आव्हान आहे दिग्दर्शनाचं. ‘वेड’ या चित्रपटाच्या घोषणेसोबत रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच दिवाळीच्या निमित्ताने रिलीज करण्यात आले आहे. जे प्रचंड चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

दिवाळी पाडवाचे औचित्य साधून अभिनेता आणि आता दिग्दर्शन क्षेत्रात उतरलेल्या रितेश देशमुखने त्याचा आगामी चित्रपट ‘वेड’चे पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहिर करायला काय हरकत आहे! आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छांसकट सादर करतोय तारिख आणि चित्रपटाचा फर्स्ट लुक. आमचं #वेड तुमच्यापर्यंत येतंय ३० डिसेंबरला’. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिल्याप्रमाणे येत्या ३० डिसेंबर २०२२ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

या चित्रपटाविषयी विशेष सांगायचं म्हणजे, एकतर अभिनेता म्हणून गेली २० वर्ष अभिनय क्षेत्रात काम करणारा रितेश देशमुख आता दिग्दर्शक म्हणून समोर येणार आहे. शिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शनच नव्हे तर यामध्ये स्वतः अभिनेता म्हणून देखील तो काम करणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

शिवाय या चित्रपटाद्वारे रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनीलिया देशमुख मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तसेच अभिनेत्री जिया शंकरदेखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत आहे. याशिवाय लोकप्रिय संगीतकार अजय- अतुल यांनी या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत.

Tags: Genelia D'souza DeshmukhInstagram PostPoster ReleasedRiteish deshmukhUpcoming Marathi MovieVed
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group