Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘एक खेळ, चार खेळाडू’; अंकुश चौधरीच्या ‘4 ब्लाइंड मेन’चं मोशन पोस्टर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 23, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
4 Blind Men
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी सध्या भारी चर्चेत आहे. कारण गेल्या शुक्रवारी १९ ऑगस्ट २०२२ रोजी त्याचा ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावर प्रेक्षक आणि अगदी समीक्षकही भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. या चित्रपटाने अवघ्या चार दिवसात २ कोटींचा पल्ला पार केला आहे. या चित्रपटात अंकुश सूर्या हि भूमिका साकारतो आहे आणि त्याच्या भूमिकेवरही लोक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. यानंतर आता अंकुश आणखी एका चित्रपटातून एक वेगळं कथानक घेऊन येण्यास सज्ज आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

जिओ स्टुडिओजकडून नुकतीच एका थ्रिलर चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव ‘४ ब्लाइंड मेन’ असे आहे. हा एक अतिशय वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. ज्याची कथा ४ अंध व्यक्ती आणि १ हत्ती यांवर आधारित प्रसिद्ध बोधकथेवर चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये वेगवेगळ्या वळणावर, वेगवेगळे आयुष्य जगणाऱ्या ४ अंध व्यक्ती काही असामान्य परिस्थितीत सापडतात. मग सुरु होतो तो नशिबाचा खेळ जो कुणालाच चुकलेला नाही. त्यांचं नशीब त्यांना एक एक करून आजमावत असताना एकमेकांची भेट घालून देत. पुढे एकामागे अशा काही घटना घडत जातात कि त्यांचं आयुष्य एखाद्या वादळात अडकलेल्या नावेसारखं पलटतं.

View this post on Instagram

A post shared by Amol Todkar (@amolt66)

अभिनेता अंकुश चौधरीने या चित्रपटाचे मोशन पोस्टर आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. सोबत एक कॅप्शनही लिहिले आहे. त्याने या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘नरकाचे दरवाजे: काम, क्रोध, लोभ आणि ??? एक नवा खेळ… चार खेळाडू… क्षितीश दाते, संकर्षण कऱ्हाडे, शुभंकर तावडे आणि अंकुश चौधरी… सगळे सुटणार…? का सगळेच अडकणार…?’ या पोस्टरवरून हा चित्रपट काही वेगळे आणि थ्रिलिंग कथानक घेऊन येतोय हे समजते. या मोशन पोस्टरला सध्या सोशल मीडियावर प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

नितीन वैद्य निर्मित आणि अभिषेक मेरुकर दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत तर शुभंकर तावडे, संकर्षण कऱ्हाडे, शेखर दाते आणि मृण्मयी देशपांडे हे कलाकार अन्य मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणाले कि, ‘जेव्हा मला या चित्रपटावर काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळी मला मराठी चित्रपटसृष्टीतील जबरदस्त कलाकारांची फौज हवी होती, जे कलाकार चित्रपटातील पात्रांची भूमिका योग्य प्रकारे पार पाडतील, असे कलाकार मला भेटले.’

Tags: Ankush ChoudhariInstagram PostMarathi upcoming movieMotion PosterMrunmayeee DeshpandeSankarshan Karhade
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group