हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बाजीप्रभूंनी निष्ठा दर्शविणारा ऐतिहासिक कथानकावर आधारित ‘पावनखिंड’ प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी तमाम शिवप्रेमी आणि मराठी रसिक गर्दी करत आहेत. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सिनेमागृहांमध्ये ‘पावनखिंड’च्या शोला प्रेक्षकांनी तुफान गर्दी केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान एका चित्रपटगृहातील एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात हा चित्रपट संपतेवेळी एक तरुण शिवगर्जना . हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
One day Dream for chanting tis slogans in theater 💗
Har Har Mahadev 🙏#Pavankhind pic.twitter.com/lzHwuvVwq6— prince Gangadhar🚩 (@jai_jai_shivay) February 23, 2022
चित्रपटगृहात ‘पावनखिंड’ चित्रपट संपताना शिवगर्जना म्हणणाऱ्या या तरुणाचा हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे समजू शकेलल नाही. मात्र हा ३० सेकंदांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याची भावना अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. या तरुणाच्या शिवगर्जनेत एक उत्साह होता. एक आग होती आणि मुख्य म्हणजे सळसळणाऱ्या रक्ताची हि गर्जना होती. या तरुणाने आपल्या भारदस्त आवाजाने सर्वानाच भारावून टाकले. प्रसंगी उपस्थित प्रेक्षक देखील उभे राहिले आणि तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज कि.. म्हटल्यानंतर एकच जय हा उद्घोष ऐकू आला.
लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या शिवराज अष्टकातील हा तब्बल तिसरा ऐतिहासिक चित्रपट आहे. ‘पावनखिंड’ या चित्रपटात वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची अद्भुत यशोगाथा पहायला मिळत आहे. ही यशोगाथा पाहिल्यानंतर श्रेयनामावली दाखवली जात असताना या तरुणाने आपल्या भारदस्त आवाजात शिवगर्जना म्हटली आहे. या तरुणाची शिवगर्जना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, सुरभी भावे, माधवी निमकर, दिप्ती केतकर, प्राजक्ता माळी, वैभव मांगले, हरीश दुधाडे, विक्रम गायकवाड, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना, शिवराज वायचळ, राजन भिसे, सुश्रुत मंकणी या कलाकारांसोबतच संतोष जुवेकरनं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.
Discussion about this post