हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या घटस्फोटाच्या निर्णयावर विविध चर्चा सुरु आहेत. अशातच मानसी नाईकने घटस्फोटासाठी अर्ज दिल्याची माहिती स्वतःहून माध्यमांना दिली होती. त्यानंतर ती सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या विविध पोस्टमुळे चर्चेत येत आहे. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान मानसी नाईकने पती प्रदीप खरेरावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर प्रत्युत्तर देताना प्रदीप खरेराने नाव न घेता एक पोस्ट शेअर केली आहे.
अलीकडेच मानसी नाईकने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैवाहिक आयुष्यातील गंभीर मुद्द्यांवरील पडदा उघड केला. दरम्यान तिने घटस्फोट का घेत आहोत सांगताना पती प्रदीप खरेरावर गंभीर आरोप केले. ती म्हणाली कि, ‘काही लोक फक्त पैसे व प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकप्रिय व्यक्तींशी संबंध जोडतात. जोपर्यंत त्यांच्याकडून पैसे मिळत आहेत, तोपर्यंत त्यांना लुटतात. असंच काहीसं माझ्या बाबतीतही झालं आहे. सध्या माझ्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. पण या सगळ्या गोष्टी मला बाहेर आणायच्या आहेत आणि त्या मी आणेन.’
मानसी नाईकच्या या आरोपांवर तिचा पती प्रदीप खरेरा याने आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अप्रत्यक्षरित्या तिला सडेतोड उत्तर दिले आहे असे म्हणता येईल. सोशल मीडियावर त्याने आपला एका फोटो शेअर करत लिहिले आहे कि, ‘आपण जे बघतो त्यावर कायमच विश्वास ठेवू नका. ते सर्व खरं असतं असं नाही. कारण मीठही कधी कधी साखरेसारखं असल्याचा भास होतो’. मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ रोजी झाली होत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसले. प्रेम व्यक्त करताना दिसले. पण आता दोघांनीही इंस्टावरून आणि आयुष्यातून एकमेकांना डिलीट केले आहे.
Discussion about this post