हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी सिनेसृष्टीत आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची बरीच चर्चा आहे. हास्य जत्रेचे सूत्रसंचालन आणि त्यानंतर ‘रानबाजार’ वेब सिरिजमध्ये साकारलेली रत्ना यांनी प्रेक्षकांचं मन जिंकले आहे. यानंतर आता लवकरच ‘वाय’ या चित्रपटात एका अनोख्या भूमिकेतून प्राजक्ता चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तत्पूर्वी सोशल मीडियावर तिने चाहत्यांना एक चॅलेंज दिलं आहे. याचा सिनेमाशी संबंध नसला तरी योग दिनाशी आहे. उद्या २१ जून रोजी जगात योग दिन साजरा केला जाईल. या दिनानिमित्त आपणही काही वेगळं करू शकतो असं सांगत तिने एक व्हिडिओ पोस्ट करताना चाहत्यांना एक योग चॅलेंज दिले आहे.
प्राजक्ताचे जेव्हढ नाव मनोरंजन विश्वात कमावले आहे तेव्हढेच नाव तीने योग साधनेत देखील कमावले आहे. कारण योग साधनेच्या माध्यमातून ती फिगर मेन्टेन करण्यावर भर देते. त्यामुळे प्राजक्ताच योग साधनेशी अनोखे नाते आहे. तसे तीच सोशल मीडिया हॅण्डल पाहिलं तर बऱ्याचदा ती स्वतःचे योगा करतानाचे फोटो आणि विडिओ शेअर करताना दिसते. याहीवेळी तिने असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने चाहत्यांना एक चॅलेंज दिलय. तिने या व्हिडिओमध्ये चक्क १०८ सूर्य नमस्कार घातले आहेत आणि मुख्य म्हणजे हे सूर्य नमस्कार तिने न थांबता आणि न थकता घातले आहेत. या व्हिडिओत ती म्हणते की, सकाळी रम्य वातावरणामध्ये सुर्यनमस्कार आणि व्यायाम करण्याची मजा काही औरच असते. या व्हिडिओमध्ये तिने एक भन्नाट कॅप्शन दिले आहे. त्यातच चाहत्यांसाठी चॅलेंज आहे.
प्राजक्ताने व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलं आहे की, ‘१०८ सूर्यनमस्कार.. (जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने, आज केले. योगा दिन २१ ला असतो.) कदाचित २१ ला परत करेन, तुम्ही पण माझ्याबरोबर करणार असाल तर …काय म्हणता, करणार का? (जमेल तितके करा…) (सूर्यनमस्कार घालण्याच्या अनेक पद्धती आहेत… हा मैसूर style हट सूर्यनमस्कार आहे. )’ असे म्हणत तिने चाहत्यांना योगा दिनानिमित्त तिच्यासोबत सूर्यनमस्कार घालण्याचे चॅलेंज दिले आहे. काय मग तुम्ही तयार आहात का प्राजक्ताच्या चॅलेंजसाठी..?
Discussion about this post