हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने आजतागायत विविध माध्यमांतून प्रेक्षकांचे भरभरून प्रेम केले आहे. अगदी मालिका, चित्रपट, वेब सिरीज आणि सूत्रसंचालिका म्हणूनही तिने आपला ठळक ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. त्यात प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
ज्यामुळे ती वारंवार विविध पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोज्वळ भूमिकांपासून ते नकारात्मक भूमिकांपर्यंत प्राजक्ताने झेप घेतली आहे आणि यामुळेच तिला झी टॉकीजच्या ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण..?’ या मानांकित पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकन मिळाले आहे.PRajakta
प्राजक्ताने साकारलेली ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील मेघना असो किंवा ‘पांडू’मधली करुणा असो.. इतकेच काय प्राजक्ताच्या ‘रानबाजार’मधल्या रत्नाने सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवला आहे. या तिन्ही भूमिका अतिशय वेगवेगळ्या टोकाच्या आहेत. प्राजक्ताच्या पांडू चित्रपटातील साकारलेली करुणा ताई हि भूमिका नकारात्मक भूमिका होती. जी तिने आयुष्यात पहिल्यांदाच साकारली होती. तसेच रत्ना हे एका वेश्येचे बोल्ड पात्र होते ते हि तिने या समाजाच्या प्रतिमेला धक्का न लावता उत्तमरित्या साकारले होते. ज्यामुळे तिची सगळीकडे वाहवाह झाली.
आतापर्यंत प्राजक्ताने विविध आणि अनेक सकारात्मक भूमिका गाजवल्या होत्या. पण पांडूच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच खलनायिका झाली आणि म्हणूनच तिने साकारलेल्या या भूमिकेसाठी तिला ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ या ‘झी टॉकीज’च्या अवॉर्ड सोहळ्यासाठी फेवरेट खलनायक/खलनायिका या प्रकारांत नामांकन मिळालं आहे. मुख्य म्हणजे या कॅटेगरीत प्राजक्ता हि विद्याधर जोशी (दे धक्का २), मिलिंद शिंदे (हर हर महादेव), वैभव मांगले (टाईमपास ३), मुकेश ऋषी (शेर शिवराज) या कलाकारांसोबत स्पर्धेत आहे. त्यामुळे खरंतर हि गोष्ट अत्यंत अभिमानाची आहे आणि म्हणूनच प्राजक्ताला या पुरस्कारासाठी हॅलो बॉलिवूडकडून खूप खूप ऑल द बेस्ट!!!
Discussion about this post