Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दिसायला गोड.. स्वभावाने कडक!! पारगावच्या पोस्टात प्राजूची एंट्री; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 23, 2023
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Post Office Ughad Ahe
0
SHARES
445
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्राजक्ता माळी या नावाचाही समावेश आहे कारण मालिका, चित्रपट, वेब सिरीज आणि सूत्रसंचालनाच्या माध्यमातून प्राजूने प्रेक्षकांना आपली भुरळ पाडली आहे. कलेच्या जोरावर तिने मनोरंजन विश्वात नाव कमावले आहे. सुरुवातीच्या काळात तिने काही मालिकांमधून आपली छाप पाडली. यानंतर चित्रपट आणि पुढे सोनी मराठीवरील हास्यजत्रेचे सूत्रसंचालन करून तिने जिंकलंच. आता ती आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असून तिची गाडी पुन्हा एकदा मालिका विश्वाकडे वळली आहे. हे ऐकून तिचे चाहते प्रचंड खुश झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

अभिनेत्री प्राजक्ता माळी हि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका म्हणून काम पाहत आहे. शिवाय इतर चित्रपट आणि वेब सिरीज ती करत असते. यामुळे मालिका विश्वातून तिने ब्रेक घेतल्याचे दिसले. पण आता प्रेक्षकांची प्राजु पुन्हा एकदा मालिका विश्वात कमबॅक करते आहे, सोनी मराठी वाहिनीवरील ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेत प्राजक्ताची एंट्री होणार असून मालिकेला एक वेगळे वळण येणार आहे. माहितीनुसार, तब्बल ६ वर्षांनी प्राजक्ता मालिका विश्वात परततेय. त्यामुळे तिला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

पारगाव पोस्टात प्राजूच्या एंट्रीने काय धमाल होणार..? हे पाहणे फारच उत्सुकतेचे आहे. या पोस्टात संगणक आल्याने आधीच कामाचा गोंधळ झालाय आणि त्यातच आता प्राजूची पोस्टात एंट्री झाल्याने आणखीच धुराळा उडणार हे नक्की. प्राजक्ताच्या एंट्रीचा एक प्रोमो वाहिनीने शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘दिसायला गोड, स्वभावाने कडक, पोस्ट ऑफीसमध्ये पूजा येणार बेधडक!’ म्हणजेच मालिकेत प्राजक्ता पूजा हे पात्र साकारते आहे. रोज पोस्ट ऑफिस सुटल्यानंतर सर्वांना १ तास आता पूजाच्या शाळेत संगणकाचे धडे गिरवायचे आहेत. दिसायला गोड असली तरीही शिकवणीच्या बाबतीत ती एकदम कडक दिसते आहे. त्यामुळे पूजाच्या शाळेत कोणता विद्यार्थी होणार पास आणि कोण होणार नापास..? हे जाणून घेण्यासाठी ‘पोस्ट ऑफिस उघड आहे’ जरूर पहा.

Tags: Post Office Ughad AhePrajakta maliSony Marathitv serialViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group