हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल सगळ्याच मुली सर्रास लगीनसराई म्हटलं कि शरारा, घागरा, अनारकली लेहंगा नाहीतर मग लाचा, डिझायनर गाऊन परिधान करतात. साहजिकच यात मुली सुंदर दिसतात आणि यात काहीच वाद नाही. पण खरंखरं सांगू का..? मुली खऱ्या सुंदर दिसतात त्या साडीतच आणि त्यात जर महाराष्ट्रीयन लूक असेल तर क्या बात है! असाच कमाल लूक प्राजक्ता माळीने तिच्या भावाच्या लग्नासाठी केला होता. एकदम अस्सल मराठमोळी पोर वाटत होती. तिचा हा लूक सोशल मीडियावर असा काही व्हायरल झाला आहे कि काही बोलायचं काम नाही.
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे अनेकदा ती विविध पेहरावातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्यात तीच साडी प्रेम म्हणजे अहाहा… विविध डिझाईनच्या विविध साड्यांचा तिला भलताच शौक. अशातच जर भावाचं लग्न असेल तर साधं सुध राहून कसं चाललं बाई.. म्हणूनच तिने अगदी अस्सल महाराष्ट्रीयन लूक केला होता. जो तिने सोशल मीडियावर शेअर सुद्धा केला आहे. ज्यावर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया देत तिच्या लूकची तारीफ केली आहे.
प्राजक्ताने या फोटोंसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, भावाच्या लग्नासाठी हवी तशी नऊवार साडी आणि मराठी दागिन्यांसाठी जंग जंग पछाडलं… (साडी शिवलेली नाही, नेसलेली आहे..दागिने थेट कोल्हापूरातून आणलेत..) तेव्हा कुठे जाऊन look साधला गेला आणि आत्मा सुखावलां. #उत्साहाचामहामेरू #मराठीलग्न #मराठीसाजश्रृंगार #आवडतापेहराव. शेवटचा फोटो- ४ पिढ्या एकत्र लग्नाचा आनंद लूटत होती.आईचे वडील (आजी आहे,प्रवास नको म्हणून आली नाही.) आई- पप्पा, मी, भाऊ- भावजय, भाच्या.’
Discussion about this post