Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ज्यांनी फसवलं त्यांच्या भूमीत सुख कसं मिळावं..?; गोऱ्यांच्या देशात प्राजुची तळमळ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 28, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
Prajakta Mali
0
SHARES
148
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेकदा विविध चित्रपट, मालिका, नाटक यांच्या विशेष दौऱ्यासाठी आपला देश सोडून परदेश गाठावं लागत. पण मनातली आपलया देशाची जागा परदेश कितीही सुंदर असलं तरीही घेऊ शकत नाही. ज्याच्या नसानसांत देश भिनलेला असतो त्याला परदेशाची ओढही वाटत नाही. अशाच वृत्तीची मराठी अभिनेत्री प्राजक्ता माली सध्या परदेशात आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशावेळी पदोपदी तिला देशाची आणि मायभूमीची आठवण येत आहे हे तिच्या विविध पोस्टवरून समजते. आज तिने केलेली एक पोस्ट अशीच थेट काळजाला हात घालणारी ठरली आहे. तिची हि पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होते आहे आणि चाहत्यांना भावतेय.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ताने लंडनमधील काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘ने मजसी ने परत मातृभीला….सागरा प्राण तळमळला….’ भारताची आठवण येतेय असं म्हणणं चुकीचं राहिल.. आठवण त्यांची येते ज्यांना आपण विसरतो…. एक क्षण देखील हिंदुस्तान माझ्या मनातून गेला नाही. इथं मन मूळीच रमलं नाही… त्याला अनेक कारणं आहेत..,
१ – ह्याच ब्रिटीशांनी आपल्याला फसवून १५० वर्ष आपल्यावर राज्य केलं. त्यांच्या भूमीत सुख कसं मिळावं…?
२ – कोहिनूर परत देण्याचं काही नाव नाही. तो राग वेगळाच.
३ – राणी गेल्यानं देश दुखवट्यात, ती मरगळ जाणवली.
४ – इथल्या थंडीनं नुसतं गारठून नाही, जखडून गेल्यासारखं झालं.
५ – कितीही सुंदर, स्वच्छ असला तरी इथे चैतन्य नाही हे पदोपदी जाणवलं.
६ – संस्कृती, खाद्यसंस्कृती, जगण्याविषयीचं तत्वज्ञान अशा अनेक बाबतीत हे लोक विशेष माठ आहेत..

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

इथे रहात असताना त्याचे पडसाद आपल्यावर पडल्यावाचून राहत नाहीत.. आणि ह्या माठांनी १५० वर्ष भारतात राहून आपली संस्कृती, शिक्षणपद्धती, पेहराव इ. गोष्टींवर ही माठगिरी बिंबवली… (आणि वैषम्य असं की आपणही मेंदू न वापरता मोठ्या प्रमाणात ती आंधळेपणानं स्वीकारली. तो अनादर ठळक झाला.) काही स्वच्छता आणि शिस्तीच्या चांगल्या गोष्टी नक्कीच आहेत. पण क्षेत्रफळ आणि लोकसंख्या ह्यांचं गणित लक्षात घेतलं तर हे जमवणं सहजी शक्य आहे, त्यात काही rocket science नाही. कामासाठी आले नसते तर ४ दिवसात परत धूम ठोकली असती..असो… मुद्दा असा की इतर देश फिरल्यावर पदोपदी जाणवतं की सर्वच अंगांनी माझा प्रिय “भारत” किती महान देश आहे. देवाचे किती आभार मानू की मी भारतात जन्माला आले. फक्त २ दिवस बाकी.. आलेच….थेंब्स नदीच्या काठावर…

Tags: Instagram PostlondonMarathi ActressPrajakta maliViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group