हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्राजक्ता माळीचे नाव अगदी सहज घेतले जाते. टीव्ही मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून प्राजक्ताने नेहमीच विविध ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी नितांत प्रेम केले आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याची एकही संधी ती सोडत नाही. विविध लूकमधील फोटो, व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांचे लक्ष वेधत असते. मात्र अशाच एका फोटोमुळे प्राजक्ता आता मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्याचं झालं असं की, अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर साडीतील सुंदर असे फोटो शेअर केले आहे. या फोटोत तिने मरून रंगाची काळ्या आणि ग्रे रंगाची बॉर्डर असलेली डिझायनर सिल्क साडी आणि सोबत वेलवेट रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे. सोबतच साजेचा मेकअप, ज्वेलरी आणि मोकळ्या केसांसह तिने हा लूक पूर्ण केलाय.
या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने ‘देखा जो तुमको’ या गाण्याचे बोल लिहिले आहेत. या फोटोंवर तिच्या अनेक चाहत्यांनी विविध प्रकारच्या कमेंट करीत तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे. मात्र या फोटोमुळे आता प्राजक्ताला आपण सुंदर दिसणे हा गुन्हा आहे का काय..? असे वाटू लागणार आहे. कारण याच फोटोमुळे प्राजक्तावर संकट कोसळलं आहे. प्राजक्ताच्या फोटोवर कमेंट करत तिच्या चाहत्याने तिच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा आरोप केलाय आणि यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
प्राजक्ताचे हे फोटो सुंदर आहेत यात काहीच वाद नाही. पण तिच्या सौंदर्यावर तारीफ करता करता केस करणार म्हणणाऱ्या या चाहत्याने तिच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. त्याने म्हटलं आहे कि, ‘तुझ्यावर खुनाचा प्रयत्न म्हणून केस टाकणारे मी… मी मेलो तर सर्वस्वी तू जिम्मेदार असणार … सुंदर तरी किती असावं ना!!’ अशी एकच नाही तर अशा बऱ्याच कमेंट्सने या फोटोंचा कमेंट्सबॉक्स भरला आहे. क्षणभर धडकी आणि दुसऱ्या क्षणात हसू आवरता येणार नाही अशा प्रतिक्रिया देणारे हे चाहते प्राजक्ताला नेहमीचं फॉलो करतात. तिने एखादा फोटो शेअर केला कि यांची कमेंट पडली म्हणून समजाचं.
इतकंच काय तर आणखी एका नेटकऱ्याने तर चक्क शायरी केली आहे. त्याने कमेंटमध्ये लिहिलंय कि, ‘शोर न कर धड़कन ज़रा थम जा कुछ पल के लिए। बड़ी मुश्किल से मेरी आँखों में उसका ख्वाब आया है।।’ तर काही नेटकऱ्यांनी कमेंटबॉक्समध्ये गाणी लिहिली आहेत. आता याला वेड म्हणायचं, प्रेम म्हणायचं का आणखी काही ..? याचा निर्णय घेण्यास सर्वस्वी प्राजक्ता माळीच जबाबदार.
Discussion about this post