हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक प्राजक्ता माळी. हास्यजत्रेची सूत्रसंचालक ते रानबाजारमधली रत्ना अशा विविध भूमिकांमधून अलीकडे प्राजक्ता वारंवार चर्चेत राहिली आहे. त्यात प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. यामुळे विविध फोटो, व्हिडीओ, रीलमधून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. इतकेच नाही तर तिच्या फोटोंनी आतापर्यंत कित्येक नेटकऱ्यांच्या विकेट काढल्या असतील. प्राजक्ताच हे फोटोशूट नेहमीपेक्षा थोडं वेगळं आणि हटके असल्यामुळे लक्षवेधी ठरलं आहे.
प्राजक्ताने हे नवं फोटोशूट तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. यामध्ये प्राजक्ता फारच वेगळी पण मनमोहक सुंदरीसारखी भासते आहे. तिचा हा लूक एखाद्या राजकन्येसारखा वाटतोय किंवा मग एखाद्या साम्राज्याची राणी म्हणूयात. प्राजक्ताने या फोटोंमध्ये ओडिशातील विशेष पटचित्र साडी परिधान केली आहे. त्यावरील पटचित्रे अतिशय आकर्षक आहेत. तर प्राजक्ताने यावर साजेसे दागिने परिधान केल्यामुळे ती आणखीच सुंदर दिसते आहे. त्यात प्राजक्ताच्या सुंदर चेहऱ्यावरील हाव भाव.. हे इतकं सुंदर का दिसायचं कुणी…? असंच वाटत आहे.
प्राजक्ताने हे फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये वसंतसेना असे लिहिले आहे. तर प्राजक्ताच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी तिच्या सौंदर्याचे आणि साडीचे विशेष कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी प्राजक्तावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.
एका नेटकऱ्याने म्हटलंय, मरतो का काय..? तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं आहे कि, काय गोड दिसतेय प्राजु..! घायाळ केलस. तर आणखी एका नेटकऱ्याने प्राजक्ताच्या केसांचे कौतुक करीत म्हटले आहे कि, अप्रतिम सुंदर……. ते अप्रतिम केस….. प्रेमात वेडा झालो. आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय कि, फुलासारखी नाजूक आणि परी पेक्षा सुंदर.. कसली भारी दिसतीये.
Discussion about this post