हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत गोड, सुंदर आणि सालस अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सतत विविध पोस्ट शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष अगदी सहज वेधून घेताना दिसते. तिच्या जवळपास सगळ्या पोस्ट सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असतात. अनेकदा आपला नवा लूक, रिल्स, व्हॅकेशन फोटो, प्रोजेक्ट्सची माहिती ति सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना देत असते. काही पोस्टमूळे अलीकडे तिला ट्रोल व्हावं लागलं. पण कोई बात नहीं! तिच्या चर्चेत काही खंड पडलेला नाही हे नक्की. आताही तिची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.
प्राजक्ताने शेअर केलेली पोस्ट काही राजकीय, सामाजिक अशा काही विषयावर नाही. पण तरीही तिची हि पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता लग्न कधी करणार..? याबाबत अनेक प्रश्न विचारले जात असताना तिने शेअर केलेली हि पोस्ट चाहत्यांची धडधड वाढवू लागली आहे. त्याच काय आहे.. प्राजक्ताने गेल्या काही दिवसांपासून ‘आता राहिले सहा दिवस’, ‘पाच दिवस’, ‘चार दिवस’..’वाट पहा’ अशा काऊंटडाऊन पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यामुळे प्राजक्ताला नक्की काय सांगायचंय याबाबत आधीच चाहते उत्सुक आहेत. त्यात तिने आता जी पोस्ट शेअर केली हे त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
यावेळी चर्चा होण्याचे कां म्हणजे तिने पोस्टमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने विविध आभूषणं अंगावर चढवून शृंगार केल्याचे दिसत आहे. तिच्या कानात, गळ्यात, हातात, पायात पारंपरिक आभुषणं दिसत आहेत आणि बॅकग्राऊंडला अतिशय कर्णमधुर संगीताच्या स्वर लहरी ऐकू येत आहेत. यासोबत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘नक्कीच साखरपुडा अथवा लग्न नाही… त्यासाठी “वाट बघा”….भेटूया उद्या ५.३० वाजता – Insta live वर… नक्की या. #आनंद #समाधान #धाकधूक #नवंकाहितरी #prajakttamali @♥️आनंद,समाधान,धाकधूक..नवं काहीतरी…’ आता यामध्ये प्राजक्ताने स्वतःच लग्न साखरपुडा नाही हे सांगितलंय. मग नक्की काय..? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे ज्याचं उत्तर ती आज इंस्टा लाइव्हमधून देणार आहे.
Discussion about this post