हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदा ६ मार्च रोजी होळीचा सण संपूर्ण राज्यभरात उत्साहात साजरा केला गेला. होळीच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र धुळवड साजरी केली जाते. यानिमित्त मित्र मंडळी, कुटुंबीय एकत्र येऊन आनंदाने हा सण साजरा करतात. परंपरेप्रमाणे या दिवशी होलिका दहनाची राख एकमेकांना लावली जाते. आजही अनेक ठिकाणी अशीच धुळवड साजरी केली जाते. तर काहीजण राखशिवाय रंगांचा देखील वापर केला जातो. शहरांमध्ये आजच्या दिवशीच रंगपंचमी खेळली जाते. तर अभिनेत्री प्रार्थना बेहरेने देखील तिच्या पतीसोबत होळीचा पुरेपूर आनंद लुटला आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रार्थना तिच्या नवऱ्यासोबत मस्त अंदाजात फोटो क्लिक करताना दिसते आहे. मुख्य म्हणजे यावेळी प्रार्थना आणि नवरा अभिषेक दोघेही विविध रंगानी माखलेले दिसत आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर होळीचा आनंद इतक्या रंगांमध्येही स्पष्ट दिसून येत आहे. प्रार्थनाने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘प्रेमाचा रंग…💜 सर्वांना होळीच्या शुभेच्छा!!’. प्रार्थनाच्या या पोस्टवर नेटकरी तसेच सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी कमेंट करत होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने दिनांक १४ नोव्हेंबर २०१७ रोजी अभिषेक जावकरसोबत लग्नगाठ बांधली. प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे अनेकदा ती स्वतःचे विविध लूक शेअर कारण्यासोबतच पतीसोबतच्या अनेक पोस्ट शेअर करते. कधी रोमँटिक तर कधी अर्थपूर्ण पोस्टसह ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. प्रार्थनाने पाचव्या अनिव्हर्सरीनिमित्त शेअर केलेला पतीसोबतचा एक सुंदर आणि रोमँटिक व्हिडिओ अजूनही चर्चेत आहे. प्रार्थनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, अलीकडेच तिची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ हि लोकप्रिय मालिका संपली. प्रार्थनाची हि मालिका चांगलीच गाजली. यानंतर प्रार्थना विविध इव्हेन्ट करते आहे आणि लवकरच काही प्रोजेक्ट घेऊन येणार आहे.
Discussion about this post