हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहरे विविध माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. अलीकडेच तिची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ हि मालिका संपली. या मालिकेवर प्रेक्षकांनी तुफान प्रेम केले. मालिका असो किंवा चित्रपट असो प्रार्थना नेहमीच तिचे १०० टक्के देऊन आपल्या भूमिकेला योग्य न्याय मिळवून देते. मालिकेनंतर आता पुन्हा एकदा प्रार्थना चित्रपटात कधी दिसेल.? असा प्रश्न पडलेला असताना ती सध्या काय करते..? या प्रश्नाचं उत्तर देणारा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
आपण जे काम प्रोफेशन म्हणून करतोय त्याहून काहीतरी वेगळं आपल्या आवडीचं काम असू शकतं यात काहीच शंका नाही. त्यामुळे आपल्या आवडीची गोष्ट करताना होणार आनंद काही औरच असतो. अभिनेत्री प्रार्थना बेहरे हि जितकी उत्तम अभिनेत्री आहे तितकीच उत्तम नृत्यांगना आहे. त्यामुळे अभिनयाइतकंच तीच नृत्य कलेवर प्रेम आहे.
तिने लहानपणी भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचे धडे गिरवले आहेत आणि आता तब्बल १५ वर्षांनी तिला हा नृत्याविष्कार सादर करण्याची संधी मिळाली आहे. याबाबत तिने स्वतः पोस्ट शेअर करून सांगितले आहे. हि एक व्हिडीओ पोस्ट असून यात प्रार्थना भरतनाट्यम सादरीकरणापूर्वीची तयारी करताना दिसतेय. प्रार्थनाने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘१५ वर्षानंतर…तुमच्या प्रेमासाठी, आशीर्वादासाठी आणि कौतुकासाठी खूप धन्यवाद’
या व्हिडीओमध्ये ती भरतनाट्यम नृत्य सादरीकरणाचा सराव करताना दिसतेय. तसेच तिची वेशभूषा आणि अलंकार परिधान करतानादेखील दिसत आहे. तिचा हा लूक इतका सुंदर आणि लक्षवेधी आहे कुणीही पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडेल. प्रार्थनाने या व्हिडिओमध्ये भरतनाट्यम नृत्य कलेच्या काही हरकतींचे सादरीकरण केले आहे. या प्रत्येक मुद्रेतील तिची पोज अतिशय रेखीव आहे. प्रार्थनाच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत तिचा उत्साह वाढवला आहे. तसेच तिच्या सादरीकरणाचे कौतुकदेखील केले आहे.
Discussion about this post