हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका आणि चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा मोठा असा चाहता वर्ग आहे. यामुळे तिने सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर केली कि ती चांगलीच व्हायरल होताना दिसते. नुकताच तिने आपल्या पतीसोबतचा एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
प्रार्थनाने शेअर केलेल्या या व्हिडिओमागे एक खास कारण आहे आणि ते म्हणजे ऍनिव्हर्सरी. होय प्रार्थनाने १४ नोव्हेंबर २०१७ साली अभिषेक जावकरसोबत लग्नगाठ बांधली आणि आज त्यांच्या लग्नाला तब्बल ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्त तिने त्या दोघांमधील गोड क्षण चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. या व्हिडिओला तिने ‘हॅप्पी ५’ असे कॅप्शन दिले आहे.
प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. तो अर्थशास्त्रात पदवीधर असून त्याची एमबीए करण्याची इच्छा होती. मात्र कॉलेजच्या दिवसांत इव्हेंट मॅनेजमेन्टसाठी काम करणाऱ्या अभिषेकला मित्राने चित्रपट निर्मितीत येण्याचा सल्ला दिला आणि त्याने हे क्षेत्र गाजवले. तर प्रार्थनाने ‘मितवा’ चित्रपटातून मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण केले आणि बघता बघता तिने इंडस्ट्री व्यापून घेतली.
Discussion about this post