हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ शेअर करून ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. प्रार्थना बेहरेचे सोशल मीडिया इंस्टाग्रामवर २.३ मिलियन इतके फॉलोवर्स आहेत. यामुळे प्रार्थनाने शेअर केलेली प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते. तिचे विविध लूक नेहमीच तिच्या चाहत्यांची पसंती ठरतात. मात्र यावेळी प्रार्थनाचा बोल्ड लूक पाहून चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत साकारलेली साधी, सोज्वळ नेहा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. त्यामुळे प्रार्थनाला बोल्ड लूकमध्ये पाहून चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर प्रार्थनाने काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. यामध्ये प्रार्थना निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या स्ट्रीप बिकिनीत दिसते आहे. स्विमिंग पूलच्या शेजारी पाण्यात पाय टाकून बसलेली प्रार्थना पहिल्यांदाच इतक्या बोल्ड अंदाजात दिसली आहे. खरंतर या लूकमध्ये प्रार्थनाने सोशल मीडिया हादरवून टाकला आहे. पण चाहत्यांना मात्र तिचा बोल्डनेस काही भावला नाही.
तिच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी विविध कमेंट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी तिला मराठी संस्कृतीची जाणीव करून दिली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले आहे कि, ‘अशा अंगवस्त्रामुळे आजकालच्या मुली खूपच वाया होत आहेत. आधी कलाकारांनी आपले सौंदर्य नीट सांभाळून ठेवा नंतर मग जगासमोर उभे रहा’. तर आणखी एकाने लिहिलंय, ‘मॅडम अस नका करू.. असले नग्न फोटो नका टाकू.. काही गोष्टींना मर्यादा आहेत’. तर आणखी एकाने म्हटले, ‘चुकीचा संदेश जातोय तुमच्या फोटोमधून ताई.. मराठी संस्कृतीला शोभत नाय हे’.
तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘प्रार्थना बेहरे मॅडम… आपण एक मराठी सुसंस्कृत अभिनेती आहात… आपला रिस्पेक्ट आहे परंतु अशा वस्तूस्थितीतील फोटोज आपणास शोभा देत नाही स्वतःहून स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका कारण ही आपली संस्कृती नाही’. अजून एकाने लिहलेय, ‘सुंदरतेची व्याख्या फक्त नग्न फोटो असा ट्रेण्ड का होतोय ??? अंगभर कपड्यात जी शालीनता … राजस पणा आहे तो वित भर बिकिनित नाही’.
Discussion about this post