हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चेत असणारी मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अशी काही जादू केली आहे कि, या मालिकेने कधी निरोपच घेऊ नये अशी काही प्रेक्षकांची इच्छा आहे. पण कोणत्याही कथानकाला एका वळणावर येऊन थांबावे लागतेच. सध्या सोशल मीडियावर हि मालिका पुन्हा एकदा निरोपाच्या दिशेने मार्गस्थ झाल्याची चर्चा आहे. आता यात किती तथ्य आहे याबाबत अजून काही अधिकृत माहिती नाही. पण प्रार्थनाने शेअर केलेली पोस्ट असाच संकेत देत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांची केमिस्ट्री छोटा पडदा गाजवते आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या आग्रहाची पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि आता मालिकेतील ट्विस्ट दिवसेंदिवस रंजक होत आहेत. मध्यंतरी मालिकेतील मुख्य पात्र नेहा आणि यशचा अपघात झाल्याचे दाखविले. ज्यामध्ये नेहाचा मृत्यू झाल्यामूळे यश एकटा पडला. यामुळे प्रेक्षक नाराज झाले. पण काही दिवसांनी मालिकेत या पात्राने पुन्हा ‘अनुष्का’ म्हणून नवीन एंट्री केली आणि कथेला वेगळं वळण मिळालं. अलीकडेच हि अनुष्का म्हणजेच नेहा असल्याचे प्रेक्षकांना समजले आहे पण आता यशला कधी समजणार अशी उत्सुकता आहे.
अशातच प्रार्थनाने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे काही अशा पोस्ट शेअर केल्या आहेत, ज्यामुळे हि मालिका आता शेवटावर येऊन ठेपली आहे असे वाटत आहे. या मालिकेतील अनुष्काचा लूक शेअर करत प्रार्थनाने म्हटले आहे कि, ‘काहीच दिवस बाकी’. तर मालिका संपल्यानंतर ‘सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री झोपणार’ असे प्लॅनिंगदेखील तिने शेअर केले आहे. ज्यावर नेहाची मैत्रीण शेफालीचे पात्र साकारत असलेली अभिनेत्री काजल काटेने ‘मीही तुझ्या प्लॅनमध्ये सहभागी होणार’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. आता या पोस्ट पाहता नेटकऱ्यांची शंका खरी ठरू शकते असेच वाटेल. पण मालिका संपणार कि नवे वळण घेणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Discussion about this post