हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस हा अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो आहे. ज्यामध्ये १०० दिवस विविध क्षेत्रातील विविध विचारसरणीची माणसं एका घरात एकत्र राहतात. इथे विविध टास्क होतात, फन गेम होतात.. पण आहे तर हि एक स्पर्धाच. इथे खेळणारे कितीही असो, जिंकणारा एकच असतो. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सध्या ९३ टप्पे पार करून अवघ्या काही दिवसांतच निरोप घेण्याच्या मार्गावर आहे. अशातच या घरातील या पर्वाचे शेवटचे एलिमिनेशन झाले. यावेळी घरातून प्रसाद जवादे बाहेर पडला आणि त्याचा बिग बॉसचा प्रवास इथेच थांबला.
बिग बॉसच्या घरात ९३ दिवस तोडीचा गेम खेळून शेवटच्या टप्प्यात प्रसाद जवादे घराबाहेर पडला आणि यामुळे त्याचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. गेल्या आठवड्यात अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, आरोह वेलणकर हे ७ सदस्य घरात टिकून राहिले होते. यामध्ये अपूर्वाने तिकीट टू फिनाले टास्क जिंकला आणि थेट फिनाले गाठले. तर राखी, प्रसाद आणि अमृता नॉमिनेट झाले. यांमधून चावडीच्या दिवशी प्रसाद जवादेने बिग बॉसच्या खेळाचा आणि घराचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसात प्रसादचा गेम वाच सुधारला होता. त्यामुळे मांजरेकरांसाठीदेखील हे एलिमिनेशन शॉकिंग असल्याचे त्यांनी म्हटले. पण शेवटी खेळच तो. इथे हार आणि जीत होतंच राहणार.. पण शो मस्ट गो ऑन!!
बिग बॉस मराठीच्या घरातून अगदी शेवटच्या टप्प्यावर बाहेर पडल्याने प्रसाद जवादे भावुक झाल्याचे दिसले. यावेळी प्रसादच्या शब्दांपेक्षा त्याचे डोळे बरंच काही बोलून गेले. पाणावलेल्या डोळ्यांनी त्याने घरातील प्रत्येकाची माफी मागितली. तो म्हणाला, ‘आपली जी भांडणं आहेत ती आपण याच घरापुरती ठेवूया’. हे ऐकल्यानंतर घरातील सदस्य आणखीच भावुक झाले आणि त्यांनीही प्रसादला निरोप दिला. या आठवड्याच्या शेवटी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा ग्रँड फिनाले रंगणार आहे. आता घरात उरलेत फक्त ६ सदस्य. त्यामुळे कोण जिंकणार..? याबाबत फारच उत्सुकता निर्माण झाली आहे.
Discussion about this post