हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसचं घर असं आहे जिथे जेव्हढी भांडण होतात तेव्हढंच प्रेमही खुलतं. या घराणे आजवर कितीतरी यशस्वी जोड्या तयार केल्या आहेत. ज्यांच्या प्रेमाचे ऋणानुबंध पुढे जाऊन साता जन्माची गाठ झाले. बिग बॉस मराठी गेल्या तीन पर्वांमध्ये या घरात राजेश श्रुंगारपुरे- रेशम टिपणीस, शिव ठाकरे- वीणा जगताप, पराग कान्हेरे- रुपाली भोसले अशा काही प्रेमाचे नाते फुललेल्या जोड्या पहायला मिळाल्या. ज्या प्रेक्षकांनाही भावल्या. यंदा बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिजनमध्येही अशीच एक जोडी तयार होऊ लागली आहे. ती जोडी कोण ते जाणून घेऊया.
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात आता प्रेमाचे वारे झुळूझुळू वाहू लागले आहेत. मध्यंतरी समृद्धी आणि त्रिशूल यांचं सूत जुळेल असं वाटत होतं. पण त्रिशूल मराठे घराबाहेर पडला आणि काही जुळण्याआधीच गोष्ट संपली. पण यानंतर आता घरात आणखी एक जोडी तयार होऊ शकते. हि जोडी म्हणजे प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांची. नुकतेच प्रसादने अमृताला थेट प्रपोज करत आपल्या मनात दडलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. बुधवारी ‘बिग बॉस’च्या घरात सीनियर- ज्युनियर हा टास्क सुरू होता आणि यामध्ये सीनियरने ज्युनियरकडून कामं करून घ्यायची होती. यावेळी प्रसाद ज्युनियर तर अमूर्ता देशमुख आणि अपूर्वा सीनियर गटात होते.
यावेळी अपूर्वा प्रसादला म्हणते, या क्षणाला अमृता देशमुखला प्रपोज कर.. मग काय..? प्रसादने चक्क गुडघे टेकले आणि तिला प्रपोज केले. तो अमृताला म्हणतो कि, ‘आपल्याला तुमच्या नावाने चिडवतात. आपल्याला या तुमच्या टॉकरवडीचा छोटासा घास घ्यायचाय..’ यावर सगळे टाळ्या वाजवतात. मग प्रसाद पुढे म्हणतो कि, मला तुझी खरी वाली फ्रेंडशिप देशील का? त्यावर अमृता म्हणजे कि, ‘फ्रेंडशिप आहेच..’ तर कुणी मागून म्हणत.. ‘अरे लव्हशिप माग’. यावर प्रसाद म्हणतो.. ‘आधी फ्रेंडशिप तर चांगली होऊदे मग पुढचं पुढे बघू.’
Discussion about this post