हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमिक शोमधून प्रेक्षकांच्या मनात आपला पश्या म्हणून ओळख निर्माण करणारा विनोदवीर प्रसाद खांडेकर आज थोडा भावनिक होताना दिसला. नेहमी सगळ्यांना हसवणारा आपला पश्या सोशल मीडियावर व्यक्त झाला. विनोदाचं अचूक टायमिंग साधणारा प्रसाद आपल्या वैयक्तिक आयुष्यात कुणालातरी फार कमी किंचितच वेळ देतोय याची त्याला जाणीव आहे. म्हणूनच ऍनिव्हर्सरीच्या निमित्ताने त्याने बायकोसाठी एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याच प्रेम, भावना आणि खंत सारं काही त्याने व्यक्त केलंय.
अभिनेता प्रसाद खांडेकरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पत्नी अल्पासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… लेखकाला लिहिताना ब्लॉक येतो तस काहीसं ही पोस्ट लिहिताना होतंय… काय लिहू सुचत नाहीये कारण प्रेमाची नऊ वर्ष आणि लग्नाची नऊ वर्ष अशी साधारण १८ वर्ष आपली सोबतीची आहेत. पण ह्या १८ वर्षात पहिल्यांदा असं झालं की मी शूटिंगनिमित्त बाहेर असल्या कारणाने जवळ नाहीये… तुला पैठणी गिफ्ट देऊन जी चूक सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न मी केला आहे’.
‘झी कॉमेडी अवॉर्डस’मध्ये ह्या वर्षी मला नाटकासाठी ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’चा पुरस्कार मिळाला. पण तो घोषित व्हायच्या आधी १५ सेकंदात सर्रकन भूतकाळ माझ्या डोळ्यासमोरून गेला…पुरस्कार जाहीर होण्याआधी मी तुझा हाथ हातात घेण्यासाठी पकडायला गेलो तर दोन्ही हातांच्या बोटांचे क्रॉस करून प्रार्थना करत होतीस. त्याचवेळी आयुष्यातील पहिल्या एकांकिकेला मिळालेल्या पुरस्काराची आठवण झाली. त्यावेळी सुद्धा माझ्या बाजूला बसून अशीच बोट क्रॉस करून बसली होतीस. सांगायचं एवढंच आहे की, कॉलेजला असताना आयुष्यात आलीस तेव्हापासून पदोपदी साथ दिली आहेस…असाच आयुष्यभर सांभाळ कर…आता तर मी आणि श्लोक दोन दोन बाळांना सांभाळावं लागतंय तुला….बाकी तुला तर माहिती आहे माझं केवढं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. आणि जे मी नेहमी म्हणतो तू आहेस म्हणून मी आहे आणि सर्वकाही आहे.’
Discussion about this post