हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लाडका आणि हरहुन्नरी कलाकार जो अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक अशा तिहेरी माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. तो म्हणजे प्रसाद ओक. आपल्या कित्येक वर्षांच्या मेहनतीने आज त्याची एक अतिशय मानाची ओळख इंडस्ट्रीत निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रसाद ओकने कौतुक करणे हि बाब सगळ्यांसाठीच विशेष आहे आणि जेव्हा बात मित्राची असते तेव्हा तर प्रतिक्रिया आणखी महत्वाची वाटते. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ३६ गुण या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करीत प्रसादने एक पोस्ट शेअर केली आहे.
समीर कक्कड दिग्दर्शित, तर संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार अभिनित ‘३६ गुण’ हा चित्रपट ४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट आताच्या तरुणाईवर आणि त्यांच्या विचारांवर आधारित आहे. ज्यामध्ये कुंडलीतले गुण जुळूनही न टिकणाऱ्या नात्यावर भाष्य केले आहे. हि कथा एक लव्ह स्टोरी आहे पण थ्रिलिंग लव्हवाली स्टोरी आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया देताना चित्रपटावर आवर्जून कौतुकाचे शब्द सांगितले आहेत. त्यात संतोष जुवेकर आणि प्रसाद ओक हे अतिशय घट्ट मित्र. त्यामुळे प्रसाद ओकने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर या चित्रपटासाठी विशेष पोस्ट शेअर केली आहे.
यामध्ये प्रसादने लिहिले आहे कि, ‘एक अत्यंत वेगळ्या वाटेवरचा सिनेमा म्हणून “36 गुण ” नक्की पहा. बऱ्याच दिवसांनी आलेली आणि टिपिकल LOVE पेक्षा जरा वेगळी STORY नक्कीच अनुभवण्यासारखी आहे. आमच्या संत्याला खूप दिवसांनी मोट्ठ्या पडद्यावर पाहिलं आणि जाम भारी वाटलं. अतोनात कष्ट घेऊन स्वतःची वेगळी वाट शोधायचा त्याचा प्रयत्न मी खूप वर्ष पहातोय. त्या वाटेवरचा त्याच्यासाठीचा हा फार महत्वाचा सिनेमा आहे. पूर्वा पवार या माझ्या मैत्रिणीनी सुद्धा फार सुंदर काम केलंय. समित कक्कड नी अत्यंत वेगवान पद्धतीनी दिग्दर्शित केलाय हा चित्रपट. संपूर्ण टीम ला मनःपूर्वक शुभेच्छा…!!!’
Discussion about this post