Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘या भूमिकेने, चित्रपटाने मला जे काही दिलं..’; ‘धर्मवीर’च्या वर्षपूर्तीनिमित्त प्रसाद ओकची खास पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 14, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Dharmaveer
0
SHARES
48
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही वर्षात आघाडीचा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणून प्रसाद ओक प्रखरपणे समोर आला आहे. त्याने दिग्दर्शित केलेला ‘चंद्रमुखी’ आणि अभिनित ‘धर्मवीर’ हे दोन्ही चित्रपट मराठी सिनेसृष्टीच्या यशाचे पुढचे पाऊल ठरले. ‘धर्मवीर’ या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिस अक्षरशः गाजवला. शिवाय अनेक पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. गतवर्षी १३ मे २०२२ रोजी आलेल्या ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा पुढील भाग आता लवकरच येणार आहे. तत्पूर्वी या कलाकृतीची वर्षपूर्ती साजरी करताना प्रसादने एक पोस्ट शेअर करत लक्ष वेधून घेतले आहे.

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

अभिनेता प्रसाद ओकने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे यांच्या भूमिकेतील पोस्टर शेयर केले आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘धर्मवीर’ माझ्या आयुष्यातल्या या एका अनोख्या वळणाला आज एक वर्ष पूर्ण होतंय…!! या भूमिकेने, या चित्रपटाने मला जे काही दिलं ते शब्दांपलीकडचं आहे. पुन्हा एकदा प्रविण तरडे, मंगेश देसाई, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, सचिन नारकर, भट्टे काका, सचिन जोशी, मा. खा. श्रीकांत जी शिंदे आणि मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब आणि धर्मवीर च्या संपूर्ण टीम चे अत्यंत मनःपूर्वक आभार…!!! आणि रसिक प्रेक्षकांचे सुद्धा शतशः आभार…!!!’

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

पुढे प्रसादने म्हटले आहे कि, ‘धर्मवीर – भाग 2 ला सुद्धा आपले आशीर्वाद आणि प्रेम भरभरून मिळेल अशी आशा करतो…!!! “दिघे साहेब”… असेच कायम पाठीशी रहा’. प्रसाद ओकच्या या पोस्टने धर्मवीर चित्रपटाच्या पुढील भागाबाबत उत्सुकता वाढवली आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटाची सांगता होताना चित्रपट कुठेतरी अपूर्ण राहिला असे वाटत असताना काही दिवसातच याचा दुसरा भाग येणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले. त्यात आता प्रसादने हि पोस्ट शेअर करून आगामी भागाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच ताणली आहे. प्रसादला दिघेंच्या भूमिकेसाठी अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे हा चित्रपट त्याच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरला आहे.

Tags: Dharmaveer 2Instagram Postmarathi actorPrasad OakViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group