हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात जितेंद्र जोशींच्या ‘गोदावरी’ या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. निखिल महाजन दिग्दर्शित आणि जितेंद्र जोशी मध्यवर्ती भूमिकेत असलेला हा चित्रपट आज ११ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थरावर अनेक नामांकीत सोहळ्यात या चित्रपटाने यश मिळवले आहे. त्यामुळे हि कलाकृती पाहणे म्हणजे भाग्यच. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला आणि यावेळी अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक हजर होता. चित्रपट पाहून आपण भारावून गेल्याची प्रतिक्रिया देत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता प्रसाद ओक याने हि पोस्ट शेअर करताना गोदावरी चित्रपटाचे पोस्टर सोबत जोडले आहे आणि कॅप्शन लिहिताना चित्रपटाविषयी लिहिले आहे. यात त्याने लिहिलं आहे कि, ‘लेखकाला जे कागदावर म्हणायचंय ते आणि दिग्दर्शकाला जे पडद्यावर म्हणायचंय ते जेव्हा संपूर्ण टीमला 100 % कळलेलं असतं तेव्हा #गोदावरी सारखा चित्रपट निर्माण होतो..!! सध्याच्या गढूळ वातावरणात जर मराठी चित्रपटाचं “पावित्र्य” म्हणजे काय ते जाणून घ्यायचं असेल तर “गोदावरी” पहायलाच हवा.’
पुढे लिहिलंय कि, ‘प्राजक्तचं नितांत नितळ लेखन. निखिलचं तितकंच तरल दिग्दर्शन. सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय. विक्रम काकांबद्दल मी काय बोलू..?? ते “बाप” आहेत आणि कायमच राहूणार. मोने आणि नीनाताई अप्रतिम. प्रियदर्शन आणि मोहित टाकळकर लाजवाब. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो गौरीचा आणि आमच्या जित्याचा. कॅमेऱ्यासमोरची सहजता म्हणजे काय, सट्ल अभिनय म्हणजे काय ते गौरीनी आणि भूमिका उमजून काम करणं म्हणजे काय, इंटेन्स अभिनय म्हणजे काय ते जित्यानी क्षणोक्षणी सिद्ध केलंय. ए व्ही प्रफुलचंद्र चं नकळतपणे येणारं पार्श्वसंगीत हि या चित्रपटाची अत्यंत महत्वाची बाजू. संकलनामुळे चित्रपटाला आलेला “ठेहेराव” खूप मोलाचा आहे. “समृद्ध” मराठी चित्रपट म्हणजे काय हे अनुभवायचं असेल तर “गोदावरी” नक्की पहा.’
Discussion about this post