हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रसाद ओक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. यामुळे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तो नेहमीच विविध लूक, विविध व्हिडीओ आणि पत्नीसोबतचे काही मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो.
प्रसाद आणि त्याची पत्नी मंजिरी यांचे हे रिल्स सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होत असतात. आज प्रसाद यशाच्या उंच शिखरावर सर करत असला तरी त्यानेही स्ट्रगलचा एक काळ पाहिला आहे. आज पहिल्यांदाच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रसादने आपल्या आर्थिक परिस्थितीविषयी भाष्य केले आहे.
अभिनेता प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओक ही मराठी मनोरंजन विश्वातली एक लोकप्रिय जोडी आहे. प्रसाद त्याच्या कामात प्रचंड व्यस्त असताना त्याच्या पत्नीने त्याला भक्कम उभं राहताना पाठिंबा दिला. तिने घर सांभाळलं आणि प्रसादने बाहेर खिंड लढवली. अनेकदा मंजिरी प्रसादसोबत त्याच्या प्रोजेक्ट्मध्ये काम करताना दिसते. प्रसाद नेहमीच हाप्ल्या बायकोच कौतुक करत असतो तर कधी मजा मस्तीमध्ये तिची खिल्लीसुद्धा उडवतो. आजही त्याने असंच काहीसं करत बायकोमूळे आपली आर्थिक परिस्थिती बदलल्याचे सांगितले आहे.
प्रसादने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे कि, ‘आधी माझ्याकडे खूप पैसे होते, पण मग माझं लग्न झालं.. संपली गोष्ट..’. यावेळी प्रसादचे हावभाव अगदी बघत राहण्यासारखे आहेत. अत्यंत गंभीर होऊन त्याने हा गमतीशीर व्हिडीओ बनवून शेअर केला आहे.
वास्तविक हा व्हिडीओ मजा मस्तीचा भाग आहे आणि खऱ्या आयुष्यात खरोखरच प्रसादने अनेकदा मान्य केले आहे कि, मंजिरीमुळे त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले आहेत. पण ते काही असलं तरी यांची मजेशीर नोकझोक नेटकरी सुद्धा एन्जॉय करतात. अनेकदा मंजिरी वहिनीला सांगू काय..? म्हणत प्रसादला भीतीसुद्धा घालतात.
Discussion about this post