हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदाच्या वर्षात मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने यशाच्या डोहात चांगलीच मुसंडी मारली आहे. दिग्दर्शक म्हणून चंद्रमुखी तर अभिनेता म्हणून धर्मवीर हे त्याचे या वर्षातील प्रचंड गाजलेले आणि लक्षात राहणारे चित्रपट आहेत. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी आणि अगदी समीक्षकांनीही भरभरून प्रेम दिल आहे. धर्मवीर या चित्रपटात तो ठाण्याचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेत दिसला. या भूमिकेसाठी त्याने सलग ३ पुरस्कार जिंकले आहेत. यातील तिसरा पुरस्कार यंदाचा ‘माझा पुरस्कार’ हा प्रसाद ओकने पटकावला आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे काही महीने होऊन गेले असतानाच अशा विविध पुरस्कारांवर हा चित्रपट आपले नाव कोरत आहे हे पाहून प्रसादला गदगदून आलं आहे. त्याने नेहमीप्रमाणे आपल्या भावनांना वाट मोकळी करीत कृतज्ञता व्यक्त केली आहे. नुकतीच त्याने ‘माझा पुरस्कारा’नंतर एक पोस्ट शेयर केली आहे. यामध्ये प्रसादने मिळालेल्या पुरस्काराचे आणि पुरस्कार स्वीकारतानाचे फोटो शेअर केले आहेत. हा पुरस्कार त्याला अशोक मुळ्ये यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यात त्याने आपले भाग्य मानले आहे.
प्रसाद ओकणे आपल्या भावना व्यक्त करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, #धर्मवीर चा तिसरा पुरस्कार “माझा पुरस्कार” एका सच्च्या माणसाची भूमिका केल्याचं कौतुक एका सच्च्या माणसाकडून…!!! धन्यवाद मुळये काका… धन्यवाद टीम धर्मवीर. आतापर्यंत प्रसाद ओकला धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेसाठी जितके प्रेम मिळाले आहे तितके क्वचितच कुठल्या भूमिकेतून मिळाले असेल. हि भूमिका म्हणजे एक भावना आहे आणि एक विश्वास आहे जो प्रेक्षकांचा त्याने जिंकला आहे. आज खऱ्या अर्थाने एक नट म्हणून भाग्योदय झाल्याची प्रचिती प्रसादला आली आहे.
Discussion about this post