हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फड, ढोलकी, घुंगरू हे असे शब्द नुसते ऐकले तरी अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते. एकदा का ढोलकीवर थाप पडली कि आपोआपच मराठी माणसाचं काळीज धडधड करत आणि पाय थिरकू लागतात. म्हणूनच मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक अख्ख्या महाराष्ट्रासाठी अजाण मनोरंजनाची पर्वणी घेऊन लवकरच सादर करीत आहे चंद्रमुखी. या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला असून २९ एप्रिल २०२२ रोजी हा चित्रपट राज्यात प्रदर्शित होणार आहे. अनेक दिवसांपासून प्रसादच्या चंद्रमुखी’ची नुसतीच चर्चा होती. पण आता टिझर पाहून अनेकांची उत्सुकता आणखीच वाढल्याचे दिसून येत आहे.
View this post on Instagram
प्रसाद ओक याने चंद्रमुखी या मराठी आगामी चित्रपटाचा टिझर आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. या टीझरमध्ये ढोलकीचा आवाज जिव्हारी लागतोय आणि घुंगराचे बोल कानात वाजू लागत आहेत. सोबतच साजशृंगार आणि सौंदर्याची हलकी दिलखेचक अदा पहायला मिळते आहे. हा टिझर प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनी चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत उत्सुकता दर्शवली आहे. हा चित्रपट राजकारण आणि नृत्याची उपासना करणाऱ्या अदाकारी नृत्यांगनेतील संघर्ष, तसेच ओढ यावर आधारित आहे.
अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने सोशल मीडियावर टिझर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, “तो ध्येय धुरंधर राजकारणी…ती तमाशातली शुक्राची चांदणी…लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची… राजकीय रशिली प्रेमकहाणी…२९ एप्रिल पासून तमाशाचा खेळ पडद्यावर सजणार, अजय-अतुलची गाणी पुन्हा एकदा वाजणार!” अशी पोस्ट लिहीली आहे. त्यामुळे मराठी चित्रपट पाहणा-या अनेक रसिकांना नेमकं चित्रपटात असेल काय? याचा थोडक्यात पण पुरेपूर अंदाज देण्यात आलाय. शिवाय चंद्रमुखी ही विश्वास पाटलांची कांदबरी आहे. त्या कांदबरीवर आधारित हा चित्रपट आहे. तसेच अजय – अतुल या दमदार जोडीने ‘चंद्रमुखी’ला संगीत दिले आहे.
Discussion about this post