हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रशांत दामले हे सिने सृष्टीतील दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. दामले म्हणजे उत्साह आणि चैतन्याचा झरा असे म्हणायला काही हरकत नाही. कारण प्रसंग कोणताही असो तो कसा हसत खेळात पुढे न्यायचा हे दामलेंना बरोबर ठाऊक आहे. नाटकापासून, ते मालिका आणि अगदी सिनेमा सुद्धा त्यांनी केलाय आणि गाजवलाय. सुख म्हणजे नक्की काय असतं गात त्यांनी अनेकांना सुखाची ओळख करून दिली आहे. यानंतर अलीकडेच त्यांनीही अशाच सुखाचा आनंद घेतलाय. कोरोनामुळे ३ वर्षानंतर दामले आपल्या लेकींना आणि नातवंडांना भेटले आहेत. दरम्यानचा फोटो शेअर करीत त्यांनी भन्नाट कॅप्शन देत लक्ष ओढून घेतलय.
अभिनेता प्रशांत दामले यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल तर नेहमीच बोललं जात. पण त्यांच्या कुटुंबाबद्दल फारशी कुणाला माहिती नाही. प्रशांत दामले यांच्या पत्नी गौरी दामले आणि त्यांना कंकना, चंदना नावाच्या २ मुली. यापैकी चंदनाचे निहार जोशी यांच्यासोबत लग्न झाले. ते सिंगापूरला स्थायिक असतात. शिवाय त्यांना रोहन आणि अनायरा अशी दोन मूल आहेत. अर्थात प्रशांत दामलेंना २ नातवंड आहेत. तसेच धाकटी मुलगी कंकनाचे लेरॉय डिसूझा यांच्यासोबत लग्न झाले आहे. कोरोनाच्या काळात मागील ३ वर्षांपासून दामले आपल्या लेकींना आणि नातवंडांना भेटले नव्हते. मात्र ‘एका लग्नाच्या अनेक गोष्टी अस झालंय आता’ असे म्हणत त्यांनी कुटुंबियांसोबत एक छोटीशी अशी ट्रिप एन्जॉय केली आहे.
खूप दिवसांनी आपल्या माणसांना भेटणं हा काही वेगळाच क्षण असतो. अशावेळी भावनाही उत्तुंग भरून येतात. तसेच काहीसे या साखर खाल्लेल्या माणसासोबत झाले. वर्कफ्रण्टबदल बोलायचं तर आता प्रशांत दामले नाटकात कारकीर्द गाजवत आहेत. अलीकडेच झी मराठीवर किचन कल्लाकार या कार्यक्रमात खवय्येगिरी केल्यांनतर आता पुन्हा एकदा रंगभूमीचा सेवा करण्यात दामले रुजू झाले आहेत.
आतापर्यंत साखर खाल्लेला माणूस, मोरूची मावशी, एका लग्नाची गोष्ट, बहुरुपी अशी अनेक नाटकं त्यांची गाजली आहे. यानंतर आता अभिनेता आणि कवी संकर्षण कऱ्हाडे सोबत ते सारखं काहीतरी होतंय.. या नाटकात दिसत आहेत.
Discussion about this post