Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘या दिवसानं माझं आयुष्य बदललं…’; टाईमपास’च्या दगडूची खास पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 4, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prathamesh Parab
0
SHARES
65
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांची ‘टाईमपास’ चित्रपटाची सिरीज कमाल गाजली आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे ३ भाग झाले असून त्याच्या पहिल्या भागाची जादू आजही कायम आहे. २०१४ साली रिलीज झालेल्या ‘टाईमपास’ या चित्रपटाने अनेक तरुण तरुणींना प्रेमात पाडलं. या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला दगडू आणि त्याची प्राजु सगळ्यांनाच भावली. त्यामुळे आजही अभिनेता प्रथमेश परब याला अनेक प्रेक्षक दगडू म्हणूनच ओळखतात. तर प्रेक्षकांच्या या लाडक्या दगडूने एक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

अभिनेता प्रथमेश परब हा त्याच्या अभिनयाने आणि हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असतो. यामुळे त्याच्या आगामी चित्रपटांबाबत त्याचे चाहते नेहमी उत्सुक असतात. नुकतीच प्रथमेशने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यात प्रथमेशने त्याचा टाईमपास चित्रपटातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि सोबतच एक कॅप्शन लिहिलं आहे. यात त्याने लिहिलंय कि, ‘३ जानेवारी या दिवसानं माझं आयुष्य बदललं. या दिवसाने मला नवी ओळख दिली. ‘दगडू’ एक ओळख… ती कायम माझ्यासोबत राहील. ज्या दिवसाने मला ब्रेक दिला, हा दिवस कदाचित प्रत्येक अभिनेत्याला त्याच्या आयुष्यात हवा असतो. ज्या दिवसामुळे मी स्वप्नांवर विश्वास ठेवायला शिकलो. हा दिवस नेहमीच आणि कायमचा खास असेल.’

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

प्रथमेशने शेअर केलेल्या या पोस्टसह त्याने टाईमपासची ९ वर्षे हा हॅशटॅग वापरला आहे. प्रथमेशच्या या पोस्टवर अनेकांनी अनेक कमेंट केल्या आहेत. यावर दिग्दर्शक रवी जाधव यांनी हार्ट इमोजी शेअर करीत कमेंट केली आहे. टाईमपास हा चित्रपट ३ जानेवारी २०१४ रोजी प्रदर्शित झाला होता. याचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं होत आणि चित्रपटात दगडू म्हणून प्रथमेश तर प्राजु म्हणून केतकी माटेगावकरने अव्वल भूमिका साकारली होती. या चित्रपटातील गाणी आणि व्हिलनसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. यानंतर टाईमपास २ मध्ये प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. तर गेल्यावर्षी टाईमपास ३ मधून प्रथमेश आणि हृता दुर्गुळे नव्या लव्हस्टोरीतून प्रेक्षकांच्या भेटीस आले.

Tags: Instagram PostMarathi MoviePrathamesh ParabTimepassviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group