हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। MPSC हे एक मायाजाल आहे, असे म्हणत पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली आहे. मुख्य बाब म्हणजे स्वप्नील MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत न झाल्याने विना नोकरी बेरोजगारच होता. शेवटी स्वप्नीलने वयाच्या २४व्या वर्षी आपल्या आयुष्याचा अंत करून व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर समाजातील प्रत्येक स्तरातून या घटनेवर विविध प्रकारच्या संतापजनकी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील बेधडक विचार मांडणारे अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देखील यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
Please speak on it @CMOMaharashtra
#JusticeForSwapnillonkar #swapnillonkar @CMOMaharashtra pic.twitter.com/QHP9JHxV4c— Sanket Karjule (@sanketkarjules) July 4, 2021
स्वप्निल लोणकर आत्महत्या संदर्भात बोलताना प्रविण तरडे यांनी माध्यमांच्या मुलाखतीत म्हटले कि, “हा पक्ष त्या पक्षाशी युती करणार, या पक्षाचा नेता, त्या पक्षाला जाऊन भेटला, अशा एक एक दिवस सोडून रोज बातम्या येत असतात. मुळात या सगळ्यांना या सगळ्यासाठी वेळ आहे आणि इथे तरुण पोरं मरत आहेत. त्यांना नोकऱ्या देण्यासाठी मात्र ह्यांच्याकडे काय वेळ नाहीये का? आता जवळ जवळ १२-१३ आमदारांच्या नियुक्त्या होण्यासाठी दररोज राज्यपालांकडे हे लोक जात आहेत आणि म्हणे यांना वेळ नाही.. अरे दिल्लीत हेच चाललंय आणि आता महाराष्ट्रात पण हेच चालू आहे. सगळ्या भारतात हेच सुरू आहे. मग राजकारण्यांनीच जगायचं का?,” असा बेधडक सवाल तरडे यांनी केला आहे.
Mpsc मायाजाल है, कोई इसमें फंसना नहीं, ये कहकर स्वपनिल लोनकर, पूणे के रहने वाले युवा ने आत्महत्या कर ली है। स्वपनिल ने Mpsc mains क्लीयर कर लिया था, 2 साल से इंटरव्यू का इंतजार कर रहा था, ये इंतजार उसकी मौत का कारण बना। @MPStudentsUnity @yuvahallabol #nosucide #SwapnilLonkar pic.twitter.com/m96QucIcSy
— Bhaskarjobs.com ◆ (@BhaskarjobsC) July 4, 2021
स्वप्निल लोणकरच्या आईच्या डोळ्यात बघा. नक्की कोणाबद्दल आक्रोश आहे ते बघा. मी सगळ्यांबद्दल बोलतोय कारण सगळेच एक माळेचे मणी. सगळ्यांनी मिळून हि परिस्थिती निर्माण केली आहे की, प्रत्येकाच्या मनात आत्महत्येचा विचार येईल. ते नवीन सत्ता नवे मित्र करण्यात गुंतलेत. त्यांच्या नातेवाईकांना राजकारणात आण्यासाठी गुंतले आहेत. तुम्ही त्यांना कसले पाठिंबे देताय? त्यामुळे बाबांनो आपल्या आई-बाबांचा चेहरा एकदा डोळ्यासमोर आणा. काही नाही गोठ्यामध्ये बांधलेल्या गुरांच्या डोळ्यात पाणी आलेलं असेलं. पण राजकारण्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला.
“फुटपाथच्या कामातून पैसे खाणाऱ्या, त्यासाठी रस्ते उकरणाऱ्या या माणसांना आपण देशाचे आणि राज्याचे आयडॉल करून ठेवलाय… मग असेच तरुण मरणार! MPSC- UPSC करणारे, शेतकरी, कलाकार, लेखक सगळे मरणार. काल एक कलादिग्दर्शक मेला. जे जे संवेदनशील, सर्जनशील आहेत, ते सगळे मरणार आणि फक्त राजकारणी लोक जिवंत राहणार. त्यांच्याबद्दल काही बोलायला जावं तर ट्रोल करणार. ट्रोल करणाऱ्यांना हे माहिती नाही की, एक दिवस आपल्याच घरातील कुणीतरी मरणार आहे. या देशात आणि राज्यात सुखी फक्त हेच (राजकारणी) लोक जिवंत राहणार आहेत,” अशी खंत आणि प्रकरणा संदर्भात संताप प्रविण तरडे यांनी व्यक्त केला आहे.
Discussion about this post