मुंबई | देशाचा सगळ्यात मोठा शत्रू कोरोना नासल्याचे विधान मुळशी पॅटर्नचे अभिनेते प्रविण तरडे यांनी केले आहे. अफवा पसरविणारे भूत हे देशाचे सर्वात मोठे शत्रू आहेत’, असं ट्विट करत प्रवीण तरडे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान लॉकडाउन संपून आपल्या गावी परत जाता येईल, या आशेवर गेल्या महिन्याभरापासून शहरात अडकलेल्या हजारो मजुरांच्या अस्वस्थतेचा उद्रेक मंगळवारी वांद्रे स्थानकावर झाला. या नागरिकांमध्ये ट्रेन सुरु झाल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे या नागरिकांनी मोठ्या संख्येने वांद्रे स्थानकावर गर्दी केली. या घटनेनंतर अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल मत मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवीण तरडे यांनी ट्विट करत आपला मांडलं आहे.
देशाचा सगळ्यात मोठा शत्रु कोरोना नाही तर अफवा पसरवणारी भूतं आहेत .. त्यांच्या पासून लांब राहा ..
— Pravin Vitthal Tarde (@WriterPravin) April 14, 2020
दरम्यान, ट्रेन सुरु होणार असल्याची अफवा मुंबईतील नागरिकांमध्ये पसरली होती. त्यामुळे हजारोंच्या जमावाने वांद्रे स्थानकात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. लॉकडाउन जरी वाढवला असला तरी देखील ट्रेन सुरु होतील. या आशेमुळे हजारो जण वांद्रे स्थानकावर जमा झाले होते. यावर तरडे यांनी निशाणी साधत अफवांपासून सावध रहा असे आवाहन केले आहे.