Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘सर्वात जास्त घाम फोडणारा ‘धर्मवीर’ .. असं का म्हणाले प्रवीण तरडे..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 23, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Dharmaveer
0
SHARES
178
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आल्याचे दिसले आहे. याचे कारण आहे चंद्रमुखी, धर्मवीर, पांडू यांसारख्या दर्जेदार कलाकृती. यातील धर्मवीर चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी धर्मवीर या चित्रपटाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा चित्रपट शिवसेना नेते धर्मवीर आनंद दीघे यांचा जीवनपट आहे. हा चित्रपट ज्यांना थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांच्यासाठी झी टॉकीज वाहिनी येत्या २५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता टीव्ही प्रीमियर घेऊन आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Talkies (@zeetalkies)

झी टॉकीज वर होणाऱ्या वर्ल्ड प्रीमियरच्या निमित्ताने ‘धर्मवीर’ सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सिनेमामेकिंगचा पट गप्पांमधून उलगडला आहे. ते या कलाकृतीविषयी भावना व्यक्त करताना म्हणाले कि, ‘माझ्या आजवरच्या सगळ्या सिनेमांपैकी मला सर्वात जास्त घाम फोडणारा धर्मवीर हा सिनेमा आहे. अवघ्या ५ महिन्यात याचं काम पूर्ण झालं. हे सगळं इतकं फास्ट होतं की या सिनेमाच्या काही आठवणीच नाहीत. मागचं आठवून आणि साठवून ठेवेपर्यंत पुढचं शेड्यूल तयार होत. त्यामुळे सिनेमा बनवताना कॅमेरामागचा निवांतपणा अनुभवता आला नाही. पण ती घाई गडबड हवीहवीशी वाटत होती.’

View this post on Instagram

A post shared by Zee Talkies (@zeetalkies)

‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे हा धर्मवीर नेते आनंद दिघे यांचा जीवनपट आहे. त्यामुळे सिनेमातील दिघे यांच्या मुख्य व्यक्तीरेखेपासून त्यांच्या राजकीय प्रवासातील सहकाऱ्यांच्या व्यक्तीरेखांसाठी कास्टिंग निवडणे फार मोठे आव्हान होते. सिनेमाचा निर्माता आणि माझा मित्र मंगेश देसाई याची फार इच्छा होती की त्याला आनंद दिघेंची भूमिका करायला मिळावी. हट्ट नाही पण लुक टेस्ट घेण्याचा मंगेशने आग्रह धरला. पण तो काही आनंद दिघे लुकमध्ये फिट बसला नाही. यानंतर भाडिपाच्या सारंग साठे याचं नाव पुढे आलं. त्याच्या फोटोवर काम केलं. तो साहेबांच्या जवळपास जात होता, पण त्याच्या काही नियोजित कामासाठी तो परदेशात असल्याने त्याचं नाव मागे पडलं.

View this post on Instagram

A post shared by Zee Talkies (@zeetalkies)

दरम्यान दिग्दर्शक विजू माने यांनी दिघे करावेत यासाठी काही लुकटेस्ट घ्यायचं ठरलं. पण, विजू माने हे ठाणेकर… ते म्हणाले, मी जर आनंद दिघे पात्र केलं तर माझं ठाण्यात वावरणं कठीण होईल. माझं स्वातंत्र्य कुठेतरी बंदिस्त होईल. या नकारानंतर मला कास्टिंगचं टेन्शन आलं. तेव्हाच माझ्या एका मित्राने प्रसाद ओकच्या फोटोवर काही ग्राफिक करून आनंद दिघे लुक केला आणि ते फोटो मला पाठवले. तो साहेबांच्या जवळपासच नव्हे तर हुबेहुब दिसत होता. त्याक्षणी मला माझे दिघे साहेब मिळाले आणि प्रसादची ऑडिशन न घेताच मी त्याला नेमलं.

View this post on Instagram

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

हा सिनेमा कधी प्रदर्शित करायचा हे ठरलं होतं. त्यामुळे हातात ५ महिनेच होते. प्रसादचं कास्टिंग झाल्यावर एकनाथ शिंदे या पात्रासाठी क्षितिश दातेची निवड केली. आपण जेव्हा बायोपिक करतो तेव्हा अभिनय, देहबोलीवर कलाकार काम करतोच. पण आव्हान असतं ते मूळ व्यक्तीपर्यंत पोहोचणारा लुक. धर्मवीर सिनेमाबाबत हे धनुष्य आम्ही पेललं. त्याचा परिणाम म्हणून सिनेमाने कमावलेलं यश. माझ्या आजवरच्या सिनेमात सर्वात लवकर पूर्ण झालेला हा सिनेमा आहे. दिग्दर्शक म्हणून मी या कलाकृतीचा काळजीपूर्वक विचार केला कारण दिघे साहेबांच्या संपर्कात, सहवासात आलेल्या प्रत्येकाला ते आपले वाटले पाहिजे असं मला वाटत होत.’

Tags: DharmaveerInstagram Postpravin taradeViral NewsViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group