हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे लेखक, दिग्दर्शक आणि हाडाचे अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे हे त्यांच्या मुळशी पॅटर्न या चित्रपटामुळे चांगलेच प्रकाशझोतात आले. त्यांचा ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट आजही भरायचं ठिकाणी चर्चेचा विषय ठरताना दिसतो. या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः याड लावलं होतं. एका मुलाखतीदरम्यान जेव्हा मुळशी पॅटर्नच्या सिक्वेलची चर्चा रंगली तेव्हा प्रवीण तरडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत भावना व्यक्त केल्या आहेत. सलमानचा ‘अंतिम’ हा चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक होता. याविषयी तरडे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ते जेव्हा कास्टिंग विषयी बोलत होते तेव्हा त्यांनी या प्रश्नांची सुटसुटीत उत्तरं दिली. ते म्हणाले कि, “मुळशी पॅटर्न हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारित चित्रपट आहे. ‘मुळशी पॅटर्न’च्या माध्यमातून मला शेतकऱ्यांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडण्याची संधी आली होती. परंतु काही कारणांमुळे ती पूर्ण झाली नाही. हा चित्रपट जर प्रवीण तरडेने बनवला असता तर, या चित्रपटाचे नाव आणि कथानक कधीच बदलले नसते. हिंदीमध्ये देखील मी चित्रपटाचे नाव ‘मुळशी पॅटर्न’ ठेवले असते. मी स्वत: मुळशी गावचा आहे. एकेकाळी शेतीवर जगणारं हे सधन गाव मी अनुभवलं. मी जगलो आणि त्या विषयावर मी काम केले आहे. त्यामुळे या चित्रपटात मी सलमान खानला कधीच घेतले नसते. कारण सलमान या भूमिकेसाठी कधी सूट झाला नसता.”
याशिवाय आपल्या चित्रपटातील कलाकारांच्या निवडीबाबत जेव्हा एखादा प्रश्न तरडे याना विचारला तेव्हाही त्यांनी थेट उत्तर देणं पसंत केलं. ते म्हणाले कि, ‘माझ्या चित्रपटांमधील कलाकारांची निवड ही माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. अलीकडेच प्रवीण तरडे यांचे एक नव्हे तर दोन इतिहास रचत असे सिनेमा प्रदर्शित झाले आहेत. यापैकी एक म्हणजे इतिहासाशी नाळ जोडलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा मराठमोळा चित्रपट आणि दुसरा म्हणजे शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित तडफदार मराठी चित्रपट ‘धर्मवीर’. हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत.
Discussion about this post