हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मित्रांनो, एखादा मराठी माणूस मोठा होऊ पाहत असेल तर त्याचे पाय ओढणारे कितीतरी लोक सापडतील असे अनेकांनी अनुभव घेतले असतील. त्यामुळे मराठी माणूस व्यापार करायला घाबरतोच. यात काही प्रमाणात सत्यता असली तरी यावर मात करून काही मोठ्या झालेल्या व्यक्ती देखील आपण पाहिल्या असतील. याच एक भारी उदाहरण देणारा एक व्हिडीओ अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी शेअर केलाय. थेट लंडनच्या इंडरनॅशनल भाजी मंडईतून हा व्हिडीओ त्यांनी शेअर केलाय. अतिशय चांगला आणि माहिती देणारा हा व्हिडीओ जरूर पहा.
त्याच झालं असं कि, प्रवीण तरडे एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये गेले आहेत. दरम्यान एक दिवस शूटिंगला सुट्टी असल्यामुळे ते लंडन फिरायला निघाले. दरम्यान लंडनच्या इंटरनॅशनल मंडईत तरडे गेले आणि मग त्यांनी जे पाहिलं ते फारच भारी होत. तिथे त्यांना कळलं की लाखो-करोडोचा व्यापार करणाऱ्या या इंटरनॅशनल मांडत महाराष्ट्राची उंची फार मोठी आहे. कारण आयात निर्यातीच्या भागात मराठी माणसांचे वर्चस्व या मंडईत दिसून आले. मग काय..? प्रवीण तरडे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या २ मराठी भाजी विक्रेत्यांना शोधून काढलं ज्यांनी महाराष्ट्राला एका वेगळ्या भागातून परदेशात मोठं करीत नाव कमावलं आहे. इथे त्यांना भेटला चिपळूणचा सचिन कदम आणि पुण्याचा नीरज रत्तू.
प्रवीण यांनी या दोघांसोबत हा व्हिडीओ बनविला आणि या दोघांनी कसं लंडन गाठलं..? ते दोघेही महाराष्ट्रातून इथे भाजी कशी आणतात..? हा व्यापार त्यांनी कसा आणि कधी सुरु केला…? आणि महाराष्ट्रातील भाजीला ते जगात कसं निर्यात करतात..? अशा विविध महत्वपूर्ण गोष्टींची माहिती घेतली. यामागची त्या दोघांचीही धावपळ लक्षात घेऊन तरडेंनी हा व्हिडीओ बनविला आहे. ते म्हणाले कि, ‘माझा एकच हेतू की सचिन, नीरज सारखेच महाराष्ट्रातील तरुण भाजी-फळ व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय वाढवावा’. याशिवाय त्यांनी महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना सचिन-नीरजच्या मदतीनं आपला व्यवसाय वाढवण्याचं आवाहन देखील केलं आहे.
Discussion about this post