Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रेग्नेंट इलियानाने शेअर केला बॉयफ्रेंडचा फोटो; भावुक होत म्हणाली, ‘अपराधीपणाची भावना येते, पण..’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 10, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Ileana D'cruz
0
SHARES
91
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हि गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे तिची प्रेग्नन्सी. लग्नाशिवाय आई होणाऱ्या या अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांना देत आश्चर्याचा धक्का दिला. अनेकांनी तिला या बाळाचे वडील कोण आहेत..? या प्रश्नाची वारंवार विचारणा केली. काहींनी तिच्या गर्भवती होण्यावर प्रश्न उठवले तर काहींनी तिला ट्रोल केले. हे सर्व अजूनही सुरूच आहे. पण तरीही आजपर्यंत इलियानाने तिचा प्रियकर कोण आहे याबाबत खुलासा केला नाही. पण आता तिने एक अस्पष्ट मोनोक्रोम शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

View this post on Instagram

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official)

लग्नाशिवाय आई होणार म्हणून इलियाना केवळ चर्चेचा विषय नव्हे तर ट्रोलिंगचाही खास विषय ठरली. अनेकांनी अगदी अर्वाच्य भाषेतही तिला सुनावले. पण आईपणाची भावनाच वेगळी असते. जी सर्व काही सहन करण्याची ताकत देते. या ट्रोलिंगचे सत्र सुरु असताना इलियानाने पहिल्यांदाच तिच्या बॉयफ्रेंडची झलक दाखवत त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिलंय, ‘बाळाला जन्म देणे हा खूप सुंदर आशीर्वाद आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की मी हा अनुभव घेऊ शकेन. पण या प्रवासासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. माझ्या आत वाढत असणाऱ्या छोट्याशा जीवाला अनुभवणं किती सुंदर आहे हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. बऱ्याच वेळा मी माझ्या बेबी बंपला पाहून भारावून जाते. मी लवकरच तुला भेटणार आहे. काही दिवस असेही असतात जे खुप कठीण असतात.

View this post on Instagram

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official)

‘म्हणूनच मी प्रयत्न करत आहे. काही वेळा दु:खी आणि काही गोष्टी हताश वाटतात. बऱ्याच वेळा डोळ्यात अश्रू असतात आणि त्यासोबत अपराधीपणाची भावना येते. पण माझे मन मला सांगते की मी कृतज्ञ असले पाहिजे, म्हणून छोट्या छोट्या गोष्टींवर रडलं नाही पाहिजे आणि खंबीर व्हायला हवं. कारण जर मी मजबूत झाले नाही मग मी कशा प्रकारची आई होईल. मला फक्त एवढेच माहित आहे की मला बाळावर खूप प्रेम आहे. आणि आत्ता मला वाटतं की हे पुरेसे आहे. ..आणि ज्या दिवशी मी स्वत:सोबत दयाळूपणे वागत नाही तेव्हा हा प्रेमळ व्यक्ती माझ्यासोबत उभा असतो. तो माझा आधार झाला ज्यावेळी मी तुटणार होते आणि माझे अश्रू पुसले. मला हसवण्यासाठी वाईट जोक करतो. किंवा मला मिठी मारतो कारण त्याला माहित असतं की त्यावेळी मला त्याची गरज असते. यामुळे आता सर्व काही अवघड वाटत नाही.’ इलियानाने या पोस्टसह आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

Tags: Bollywood ActressIleana D'cruzInstagram PostPregnancy GossipsViral Photoviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group