हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडनंतर हॉलिवूड गाजवणारी प्रेक्षकांची लाडकी पिग्गी चॉप्स म्हणजेच बॉलिवूडची देशी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. कारण काय आहे ते महत्वाचं नाही पण देसी गर्ल देशाबाहेर असूनही सारखी चर्चेत असतेच. त्यात ती सोशल मीडियावर इतकी सक्रिय आहे कि आवर्जून आपल्या चाहत्यांसह आयुष्यातील लहान मोठ्या गोष्टी शेअर करताना दिसते. इतकंच काय तर..,मनोरंजन विश्वातील हालचालींवरदेखील ती बारीक लक्ष ठेवून असते. सध्या प्रियांका परदेशातही देशाचा फील घेण्यात व्यस्त आहे. आपण सारेच जाणतो कि, पाणीपुरी जवजवळ सगळ्याच मुलींचा वीक पॉईंट असतो. तर प्रियांकाचंही असंच काहीस आहे.
प्रियंकाची सरोगसी, तिची मुलगी मालतीचा चेहरा न दिसणारे फोटो, निक प्रियांकाचे रोमँटिक फोटो नेहमीच चर्चेत असतात. पण आपल्या फिटनेसच्या बाबतीत फारच काळजी घेणारी प्रियांका यावेळी न्यूयॉर्कमध्ये असतानाही चक्क पाणीपूरीचा आस्वाद घेताना दिसली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या आपल्या पती सोबत म्हणजेच निक जोनस सोबत परदेशात राहत आहे. त्यामुळे प्रियांका आणि तिचा पती दोघेही न्यूयॉर्कच्या विविध इव्हेंट्समध्ये सहभाग घेताना दिसतात. याहीवेळी त्यांनी एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. हा व्हिडीओ त्याच इव्हेंटमधील आहे.
या इव्हेंटमधील हा व्हिडीओ प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांकासोबत नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईसुद्धा दिसत आहेत. या इव्हेंटमध्ये प्रियंकासोबत निकदेखील सहभागी झाला होता. या इव्हेंटसाठी प्रियांकाने अतिशय सुंदर असा लॉन्ग ब्लॅक बॅकलेस आऊटफिट परिधान केला होता. यामुळे नेहमीप्रमाणे अनेकांच्या नजरा प्रियांकावर खिळल्या. तिच्या या लूकने नेटकऱ्यांचे लक्षदेखील वेधले. शिवाय परदेशी राहूनही तिला भारतीय पदार्थाविषयी वाटणारे आकर्षण आणि उत्सुकता पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.
Discussion about this post