Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रियंकाने शेअर केले मालतीचे BACK PIC; चाहते म्हणाले..,’आतातरी चेहरा दाखव’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 21, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Priyanka Malati
0
SHARES
253
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची पिग्गी चॉप्स अर्थात देसी गर्ल प्रियांका चोप्रा काही महिन्यांपूर्वीच आई झाली. सरोगसीच्या मदतीने प्रियांका आपले आईपण अनुभवत आहे. प्रियांका आणि निकला एक गोड मुलगी झाल्यानंतर तिचे नाव त्यांनी मालती मेरी असे ठेवले. प्रियांका आणि निक आपण आई बाबा झाल्याचा आनंद लेकीच्या मोठ्या होण्यात एक एक दिवस रोज साजरा करत आहेत. अनेकदा प्रियांका मालतीसोबतचे फोटो शेअर करताना दिसते. याहीवेळी तिने मालतीसोबत काही फोटो शेअर केले आहेत. पण नेहमीप्रमाणे तिने यातही तिचा चेहरा दाखवलेला नाही. यामुळे आता चाहते प्रियांकाला मालतीचा चेहरा दाखव अशी विनंती करू लागले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका अनेकदा सोशल मीडियावर आपल्या लेकीसोबतचे काही क्षण आपल्या चाहत्यांसह शेअर करताना दिसते. लाडकी लेक मालती, पती निक जोनास आणि कुटुंबीयांसोबतचे अनेक खास क्षण तिने आतापर्यंत शेअर केले आहेत. पण आतपर्यंत शेअर केलेल्या कोणत्याही फोटोत तिने मालतीचा चेहरा दाखवलेला नाही आणि याहीवेळी तिने असेच केले आहे. नुकतेच प्रियांकाने लेकी बरोबर २ फोटो इंस्टाग्राम हॅण्डलवर शेअर केले आहेत. या फोटोंना अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी पसंती दिली आहे. असे असले तरीही कुठे ना कुठे चाहते प्रियांकावर नाराज झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोत ती मालतीसह खिडकीत बसलेली दिसते. त्या खिडकीतून मालती संपूर्ण न्यूयॉर्क शहर डोळ्यात साठवते आहे. या फोटोंसह प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आमची पहिली मोठी ट्रीप’. या फोटोंना अभिनेत्री अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, सोनाली बेंद्रे तसेच अभिनेता रणवीर सिंग यांसह अनेक सेलिब्रिटींनी पसंती दिली आहे. तर प्रियांकाच्या लाखो चाहत्यांनीदेखील फोटो लाईक केलाय. पण या फोटोमध्ये मालती पाठमोरी दिसत असल्यामुळे नाराजीही व्यक्त केली आहे. आता फार उत्सुकता न ताणता प्रियांकाने मालतीचा चेहरा दाखवावा अशी विनंती अनेक चाहत्यांनी केली आहे. इतकंच काय तर काहींनी प्रियांकाला ‘मालतीचा चेहरा का दाखवत नाही..? यामागे काही कारण आहे का? असे प्रश्नदेखील विचारले आहेत.

Tags: Bollywood CelebrityInstagram PostPriyanka ChopraViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group