हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड सिनेविश्वाची पिग्गी चॉप्स अर्थात देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. मग एखादा सिनेमा असो, सिरीज असो किंवा मग इव्हेन्ट, देश असो किंवा विदेश प्रियांका लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होताना दिसते. केवळ बॉलिवूड नव्हे तर अख्ख हॉलिवूडसुद्धा प्रियांकाच्या प्रेमात आहे. नुकतीच प्रियंका इटलीत सुरू असलेल्या बल्गेरी इव्हेंटमध्ये दिसली होती. यावेळी प्रियांकाने इटलीतील बुल्गारी हॉटेल रोमाच्या उद्घाटनात क्लासी एंट्री घेतली आणि तिचा क्युट लूक पाहून जो तो स्लिप झाला. तिचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर तिने तिचा हा लूक शेअर केला आहे. तिचे फोटो आणि या इव्हेन्टमधील अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या या क्युट अंदाजाने पूर्ण इव्हेंटमध्ये उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. नुसता लूक नाही तर तिच्या अदादेखील तितक्याच कातिल होत्या. प्रियांकाच्या या लूकची सध्या भारी चर्चा सुरु आहे. प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पांढरा Giambattista Valli Couture गाऊनमध्ये दिसते आहे. हा आऊटफिट प्रियंकाने परिधान केल्यानंतर तो तिच्याचसाठी बनला असेल असे वाटत आहे.
प्रियांकाचा हा गाउन प्लंजिंग व्हि नेकलाइने डिझाइन करण्यात आला होता. शिवाय या गाऊनमध्ये हाय स्लिट आणि फ्लोर- स्वीपिंग ट्रेल भारी दिसत होता. या लुकसोबत प्रियांकाने केलेली पिगटेल हेअरस्टाईल तर इतकी क्युट दिसत होती कि कुणालाही तिला पाहतच राहावं वाटेल. प्रियांकाच्या या फोटोंवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. यातील बऱ्याच नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रियांकाची हेअर स्टाईल आवडल्याचे म्हटले आहे. तर काहींनी तिचा आऊटफिट आवडल्याचे म्हटले आहे.
Discussion about this post