हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या वर्षातील २४ फेब्रुवारी २०२२ रोजी जगाच्या एका कोपऱ्यातील दोन देशांमध्ये महाप्रलयकारी युद्ध सुरु झाले. हे युद्ध रशिया आणि युक्रेनच्या मध्ये सुरु होते पण याचा चटका अनेक देशांना सोसावा लागला. दरम्यान रशियाने कोणतीही डायान दाखवत युक्रेनच्या चिंधड्या चिंधड्या उडविल्या. दरम्यान अनेक युक्रेनियन रहिवाश्यांनी आपला देश सोडून पळ काढला आणि आश्रय घेत पोलंडमध्ये थांबले. याठिकाणी बॉलिवूडची पिग्गी चॉप्स आणि ग्लोबल युनिसेफ गुडविलची एंबेसडर प्रियांका चोप्रा जोनास पोहोचली. तिने युक्रेनमधील निर्वासितांसह लहान मुलांचीही भेट घेतली आणि इंस्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत एक कॅप्शनही लिहिले आहे.
प्रियांका चोप्रा २०१६ सालापासून ग्लोबल युनिसेफ गुडविलची एंबेसडर आहे. याच बॅनर अंतर्गत ती निर्वासित युक्रेनियन्सच्या भेटीला पोहोचली होती. प्रियांकाने या भेटीदरम्यानचे काही प्रसंग एका व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले आहेत. जगातील सर्वात मोठे मानवी संकट म्हणत तिने हि पोस्ट शेअर केली आहे. पोलंडमधील वॉर्सा येथील एक्सपो सेंटरमध्ये प्रियांका जेव्हा पोहोचली तेव्हा न दिसणाऱ्या जखमा घेऊन अनेक युक्रेनियन बेजार अवस्थेत दिसले. शिवाय याठिकाणी अनेक लहान मुले होती ज्यांना स्वतःच भविष्य देखील माहित नव्हतं.
पण प्रियांका जेव्हा याठिकाणी पोहोचली तिने या सर्व लहान मुलांना भेटून आनंद व्यक्त केला. त्यांच्यासोबत मजामस्ती केली. त्यांच्यासोबत शक्य तितका वेळ घालवला. प्रियंकाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की सर्व मुले प्रियंकासोबत आणि ती मुलांसोबत किती जास्त आनंदी आहे. प्रियांका चोप्राने युक्रेनच्या निर्वासितांसोबत झालेल्या भेटीबदल लिहिले आहे कि, ‘युद्धाच्या अदृश्य जखमा अशा आहेत ज्या आपण सहसा बातम्यांमध्ये पाहत नाही. तरीही, वॉर्सा येथील माझ्या @unicef मिशनच्या पहिल्या दिवसापासून ते आज माझ्यासाठी इतके स्पष्ट झाले आहे. युक्रेनमधील २/३ मुले विस्थापित झाली आहेत (अंतर्गत आणि बाह्य). ही प्रचंड संख्या म्हणजे युद्धाचे विध्वंसक वास्तव आहे. इथे सीमा ओलांडणारे ९०% लोक महिला आणि मुले आहेत. तर ७०% जे पळून गेले ते सीमा ओलांडून पोलंडमध्ये आले आहेत आणि संक्रमण शक्य तितके सोपे करण्यासाठी सरकार समर्थित रिसेप्शन केंद्रे अजूनही स्थापन करीत आहे.
@unicef ने पोलंडमध्ये ११ ठिकाणी आणि @refugees सोबत संपूर्ण प्रदेशात ३७ ठिकाणी ब्लू डॉट केंद्रे स्थापन करून या आणीबाणीला प्रतिसाद दिलाय. ब्लू डॉट केंद्रे अतिशय आवश्यक भूमिका बजावत आहेत आणि अनेक मार्गांनी महिलांसाठी आणि विशेषतः मुलांसाठी एक दुर्मिळ सुरक्षित आश्रयस्थान निर्माण करत आहेत. महत्त्वाची संबंधित माहिती, मानसिक आरोग्य सहाय्य, आई आणि बाळाला आवश्यक गोपनीयतेची अनुमती देण्यासाठी क्षेत्रे प्रदान करणे आणि खेळाचे क्षेत्र, जे संघर्षाच्या परिस्थितीतून आलेल्या मुलांसाठी सामान्यतेची भावना अनुभवण्यास सक्षम होण्यासाठी ते शक्य ती मदत करत आहेत आणि हे खूप महत्वाचे आहेत. हि मदत घेणाऱ्यात प्रामुख्याने युक्रेनियन लोकांचा समावेश आहे ज्यांनी स्वतः युद्धातून पळ काढलाय.
Discussion about this post