हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचं यंदाचं चौथं पर्व २ ऑक्टोबर २०२२ रोजी दणक्यात सुरु झालं. या सिजनमध्ये १६ स्पर्धक सहभागी झाले होते. बघता बघता एक एक स्पर्धक आठवड्याच्या शेवटी घराबाहेर होत गेला आणि ज्याचा त्याचा बिग बॉसचा प्रवास थांबत गेला. एकामागे एक वेगवेगळे टास्क आणि ट्विस्टसह विविध भावनांच्या ओघात हे स्पर्धक रोज नव्या आव्हानांना सामोरे जात होते. ऑल इज वेल थीमवर आधारित असलेला बिग बॉसचा हा चौथा सीजन ऑल इज नॉट वेल सुरु असल्याचे अनेकदा बोलले गेले. पण गेल्या काही आठवड्यात या शोने चांगली ग्रीप घेतली आणि प्रेक्षकांचे मन जिंकले. आता वेळ आली आहे निरोपाची. होय. बिग बॉस मराठीच चौथं पर्व आता अंतिम टप्प्यात असून काहीच दिवसात याचा ग्रँड फिनाले होणार आहे. ज्याची तारीख आता समोर आली आहे.
बिग बॉसचं घर म्हटलं म्हणजे संमिश्र भावना, बाचाबाची, भांडण, अरेरावी, हाणामारी असं काही ना काही होतंच असत. कधी मतभेद होतात तर कधी मन भेद. पण या घरातली नाती एकदम मजबूत असतात. कुणी मैत्रीचं नातं तयार करत असत तर कुणी प्रेमाचं. यंदाच्या सिजनमध्येही अशी बरीच नाती तयार झाली आणि काही टिकली तर काही तुटली. विविध आव्हानांचा सामना करून घरात शिल्लक राहिलेले स्पर्धक आता या घरातील शेवटचा दिवस पाहून लाईट बंद करून जाण्याची इच्छा उराशी बाळगून आहेत. सध्या या घरात किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, राखी सावंत, आरोह वेलणकर हे सदस्य राहिले आहेत.
काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरातील ७६ वा दिवस पार पडला. त्यामुळे आता केवळ दोन आठवडे आणि मग महाअंतिम सोहळा. फक्त काहीच कालावधी शिल्लक राहिला आहे. येत्या नववर्षाच्या सुरुवातीला बिग बॉस मराठीचे हे चौथे पर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या पर्वाचा विजेता कोण असेल..? याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता वाटत आहे. बिग बॉस मराठी ४ चा ग्रँड फिनाले येत्या ८ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत कलर्स मराठी वाहिनी आणि शो मेकर्सने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तरीही १३ आठवड्यांच्या दृष्टिकोनातून ग्रँड फिनालेसाठी हि तारीख असू शकते याची शक्यता नाकारता येत नाही.
Discussion about this post