हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| सोनी मराठी वाहिनीवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका आहेत. यांपैकी काही मालिकांमधील पात्र ही प्रेक्षकांना त्यांच्या कुटुंबाचा एखादा भाग आहेत असच वाटतं. यानंतर आता लवकरच सोनी मराठी आणखी एक मनोरंजनात्मक मालिका घेऊन येतेय. या मालिकेची खासियत म्हणजे ही एक प्रेमकथा आहे पण मराठी आणि कानडी भाषांची. होय. म्हणजेच या मालिकेतील पुरुष व्यक्तिरेखा अस्सल मराठी मातीचा रांगडा नायक आणि स्त्री व्यक्तिरेखा अस्सल कानडी सुंदरी नायिका असणार आहेत. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांसाठी काही वेगळीच लज्जत घेऊन येतेय हे नक्की. या नव्या मालिकेचे नाव ‘जिवाची होतिया काहिली’ असून हि मालिका येत्या १८ जुलै २०२२ सुरु होतेय.
View this post on Instagram
या आगामी नव्या मराठी मालिकेत एक मराठी मुलगा आणि एक कानडी मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडतात पण मग यशस्वी होतात का..? हे पाहायला मिळणार आहे. ही एक अतिशय सुंदर अशी प्रेमकहाणी आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांचा लाडका, कोल्हापूरचा रांगडा अभिनेता राज हंचनाळे दिसणार आहे. तर नायिका म्हणून अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर ही कानडी सुंदरीच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांचीही या मालिकेतील भूमिका अतिशय लक्षवेधी आहेतं मुख्य म्हणजे मालिकेत प्रमुख कलाकार म्हणून ही या दोघांसाठीही पहिलीच मालिका आहे. राज अस्सल कोल्हापुरी आणि प्रतीक्षा कानडी सुंदरीची भूमिका साकारत आहेत आणि या भूमिकांसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.
View this post on Instagram
या मालिकेची निर्मिती करण्याचे एकमेव करण म्हणजे प्रेमाला कुठे भाषा असते…? तूर्तास या नव्या कोऱ्या आगामी मालिकेची झलक सोनी मराठीच्या अधिकृत पेजवर प्रदर्शित करण्यात आली आहे. मुख्य कलाकरांबरोबरच नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकारही या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत आणि तेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. हे दोन अनुभवी कलाकार म्हणजे विद्याधर जोशी आणि अतुल काळे.
View this post on Instagram
अभिनेता विद्याधर जोशी हे कोल्हापुरी भूमिकेत तर अतुल काळे हे कर्नाटकी भूमिकेत असल्यामुळे त्यांचे पोशाख त्यांच्या भूमिकेला साजेसे आहेत. हा पोशाख देखील प्रेक्षकांना भावला आहे. कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार…? त्यांच्यात वाद होतील… तंटे होतील… प्रेम होईल…. का आणखी काही…. हे पाहण्याची उत्सुकता आता प्रेक्षकांनाही लागली आहे. येतय १८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रदर्शित होते आहे.
Discussion about this post